AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सोडलं; आदित्य ठाकरेंची घोषणा, म्हणाले- उद्यापासून आंदोलन तीव्र…

Aditya Thackeray News: मुंबई पोलिसांनी सीजेपीच्या आंदोलनकर्त्यांना सोडलं आहे. उद्यापासून आंदोलन तीव्र होणार असल्याचे ठाकरे म्हणाले आहेत.

मुंबई पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सोडलं; आदित्य ठाकरेंची घोषणा, म्हणाले- उद्यापासून आंदोलन तीव्र...
| Updated on: Oct 11, 2026 | 8:06 PM
Share

मुंबई पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सोडलं आहे, अशी घोषणा आदित्य ठाकरेंनी केली आहे. तसेच उद्यापासून आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व सीजेपी समर्थक आणि शिवसैनिकांना सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा लढा ज्ञानेश कुमारांविरोधात चालू राहणार आहे. हे आंदोलन आता उद्यापासून अधिक तीव्र होणार आहे. आंदोलनाची वेळ आणि स्थळ आम्ही थोड्या वेळात सांगू.

आदित्य ठाकरे म्हणाले की, आमची पोलिसांसोबत चर्चा झाली. पोलिसांनी आपल्याला सहकार्य केले आहे. पोलिसांनी सांगितलं की, ज्यांना ताब्यात घेतलं त्यांना सोडलं आहे. जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना आम्ही सलाम करतो. उद्याचे आंदोलन कुठे असेल हे लवकरच सांगू. सर्वांसाठी सुरक्षित जागा निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची राहिल.

ते म्हणाले की, तुषार गांधींनाही सोडलं नाही. ते आंदोलन करत असताना त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तानाशाही मुंबईत खपवून घेतली जाणार नाही. देशातील नागरिकांवर दडपशाही सुरू आहे. काही महिन्यात केंद्रातील सत्ता बदलणार आहे. सर्व देशप्रेमी आंदोलनात उतरणार आहेत. दिल्लीसारखी स्थिती मुंबईत होऊन देणार नाही. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होणार आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. दिल्लीत बीएएसएफ कशासाठी? मुंबई पोलिसांचे कौतुक केल्याने केंद्र सरकारकडून लाठी चालवण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई पोलिसांचं कौतुक केंद्र सरकारला खुपत असेल. नागरिकांविरोधात सरकारचं युद्ध सुरू आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात लढाई सुरू झाली आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

यानंतर अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, ज्यांना ताब्यात घेतलं होतं त्यांना सोडवण्यासाठी आम्ही इथे आलो होते. उद्यापासून आम्ही आंदोलन करणार आहोत. ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्या सर्वांना सोडलं आहे. उद्यापासून शिवाजी पार्कवर तीव्र आंदोलन सुरू करणार आहोत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ