Iran Russia Deal : रशियाचा सर्वात मोठा धक्का, अमेरिकेच्या कट्टर शत्रूसोबत गुपचूप मोठी डील, आता ट्रम्प…

इराण आणि रशिया यांच्यात एक महत्त्वाचा करार झाला आहे. या करारामुळे आता इराणची एका प्रकारे ताकद वाढणार आहे. या करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली आहे.

Iran Russia Deal : रशियाचा सर्वात मोठा धक्का, अमेरिकेच्या कट्टर शत्रूसोबत गुपचूप मोठी डील, आता ट्रम्प...
iran and russia deal
| Updated on: Sep 24, 2025 | 9:19 PM

Russia And Iran Agreement : सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाची जगाने धास्ती घेतली आहे. हे युद्ध थांबावे अशी भारतासह जगातील इतरही देशांचे मत आह. अमेरिका हादेखील रशियावर वेगवेगळ्या मार्गांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप यात यश आलेले नाही. रशियाकडून मात्र युक्रेनवर हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांत युक्रेनमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. असे असतानाच आता एकीकडे युक्रेनसोबत युद्ध चालू असले तरी दुसरीकडे रशिया देशांशी महत्त्वाचे करार करत आहे. आता या देशाने इराणसोबत मोठा करार केला असून तो अणुउर्जेशी संबंधित आहे.

2040 सालापर्यंत आम्हाला 20 गिगावॅट…

मिळालेल्या माहितीनुसार रशिया आणि इराण या दोन देशांनी लहान अणुउर्जा प्रकल्प तयार करण्यासाठी मोठा करार केला आहे. रशियातील मॉस्को येथे बुधवारी (24 सप्टेंबर) या करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली. हा करार करताना रशियाच्या अणुउर्जेशी संबंधित संस्था रोसाटॉमचे प्रमख अलेक्सी लिखाचेव आणि इराणच्या अणुप्रकल्पाचे प्रमुख मोहम्मद इस्लामी उपस्थित होते. मोहम्मद इस्लामी हे इराणचे उपराष्ट्रपती आहेत. 2040 सालापर्यंत आम्हाला 20 गिगावॅट उर्जेची निर्मिती करायची आहे, त्याच मोहिमेअंतर्गत आम्ही हा करार केला आहे, असे इस्लामी यांनी सांगितले. 20 गिगावॅट उर्जा तयार करण्यासाठी आम्ही एकूण आठ अणुउर्जा संयंत्रांची निर्मिती करणार आहोत. यातील चार प्रकल्प हे दक्षिणेतील बुशहरमध्ये उभे केले जातील. या प्रकल्पांमुळे इराणच्या उर्जेचा प्रश्न बराच सुटेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

इराणध्ये अणुउर्जा प्रकल्पांची काय स्थिती?

सध्या इराणमध्ये फक्त एकच अणउर्जा प्रकल्प चालू आहे. हा प्रकल्प बुशहर या शहरात आहे. या प्रकल्पाची उर्जानिर्मितीची क्षमता 1 हजार गिगावॅट आहे. इराण आणि रशिया या दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी इस्रायलने इराणच्या अणुउर्जा प्रकल्पांवर हल्ले केले होते. रशियाने या हल्ल्यांचा निषेध करून इराणसोबत आपली मैत्री असल्याचा संदेश जगाला दिला होता.

अमेरिकेने केला होता इराणवर हल्ला

दरम्यान, 13 जून रोजी इस्रायलने इराणवर हे हल्ले केले होते. या हल्ल्यात इराणमध्ये 1000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनेही इस्रायवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागले होते. या ह्ल्यांत इस्रायलचेही नुकसान झाले होते. त्यानंतर हे युद्ध थांबाव यासाठी अमेरिकेने इराणच्या 3 अणुउर्जा प्रकल्पांवर हल्ला केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा इराण आणि रशिया यांच्यात अणउर्जा प्रकल्पांसाठी करार करण्यात आला आहे.