इस्त्रायलच्या हल्ल्याने इराण हादरला, गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाचा खात्मा, तेहरानमध्ये IRGC चीफ मोहम्मद काजेमी ठार

Israel Killed IRGC Chief: इस्रायली हल्ल्यांमुळे इराणमध्ये चांगलीच घबराहट निर्माण झाली आहे. इराणच्या गुप्तचर संस्थेचा प्रमुख आणि इतर काही अधिकारी इस्त्रायल हल्ल्यात ठार झाले आहेत.

इस्त्रायलच्या हल्ल्याने इराण हादरला, गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाचा खात्मा, तेहरानमध्ये IRGC चीफ मोहम्मद काजेमी ठार
इराण इस्त्रायल युद्ध
| Updated on: Jun 16, 2025 | 2:38 PM

Israel Killed IRGC Chief: इस्त्रायल आणि इराण हल्ल्यामुळे पुन्हा एकदा इराण हादरला आहे. इस्त्रायलकडून यापूर्वी झालेल्या हल्ल्यात इराणचे सैन्य प्रमुख, कमांडर आणि नऊ अणू शास्त्रज्ञ ठार झाले होते. आता इराणच्या गुप्तचर संस्थेचा प्रमुख आणि इतर काही अधिकारी इस्त्रायल हल्ल्यात ठार झाले आहेत. इस्लामिक रिवॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) या इराणच्या गुप्तचर संस्थेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयआरजीसी प्रमुख ब्रिगेडियर जनरल मोहम्मद काजेमी आणि उपप्रमुख हसन मोहाकिक इस्त्राइल हल्ल्यात मारले गेले असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.

इस्लामिक रिवोल्यूशन गार्ड्स कॉर्प्ससंदर्भात इराणची सरकारी वृत्तसंस्था तस्नीम न्यूजने म्हटले की, इस्त्रायलच्या हल्ल्यात ब्रिगेडियर जनरल मोहम्मद काजेमी, उपप्रमुख हसन मोहाकिक इस्त्राइल आणि आणखी एक अधिकारी मोहसिन बाघेरी यांचाही मृत्यू झाला आहे. या हल्ल्याने इराणच्या लष्कराला मोठा झटका दिला आहे. या तीन अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे इराणच्या लष्करी रचनेला मोठा धक्का बसला आहे आणि देशाच्या गुप्तचर यंत्रणेवरही मोठा परिणाम झाला आहे.

कोण आहे मोहम्मद काजेमी?

मोहम्मद काजेमी २००९ पासून इराणच्या गुप्तचर संस्थेत प्रभारी होते. आयआरजीसी युनिटवर इराणमधील राजकीय कारवायांची हेरगिरी करणे, सुरक्षा देखरेख आणि अंतर्गत तपासाची जबाबदार होती. काजेमी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे विश्वासू मानले जातात. काजेमी नेहमी पडद्याच्या मागे राहिले आहे. माध्यमांमध्ये त्यांचे फोटो किंवा सार्वजनिक वक्तव्यसुद्धा मिळत नाही. हसन मोहाकिक यांना काजेमी यांची सावली म्हटले जाते. गुप्तचर संस्थेच्या सरंचनेत काजेमी यांचा उजवा हात हसन मोहकिक होते.

दरम्यान, इस्रायल हल्ल्यांमुळे इराणमध्ये चांगलीच घबराहट निर्माण झाली आहे. इस्त्रायल हल्ल्याच्या भीतीमुळे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना तेहरानच्या ईशान्येकडील लाविझान येथील भूमिगत बंकरमध्ये हलवण्यात आले. खामेनी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब या बंकरमध्ये आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, एप्रिल २०२४ आणि ऑक्टोंबरमध्ये इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांदरम्यान खामेनी यांनीही या बंकरमध्ये आश्रय घेतला होता.