इराणमधून 48 तास पूर्ण होण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांना दणका, थेट तो खळबळ उडवणारा व्हिडीओ पुढे..
इराणसोबतच्या युद्धात अमेरिका एकटी पडली आहे. यादरम्यानच अमेरिकेसाठी अत्यंत वाईट बातमी येताना दिसत आहे. अमेरिकेला धक्का बसला. चक्क इराणकडून सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला.

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले. या युद्धात 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने मोठा हल्ला इराणवर केला. या हल्यात इराणचे सर्वाेच्च नेते आयातुल्ला खामेनेई ठार झाले. त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील अनेक जण ठार झाले. या हल्ल्यात खामेनेई यांचा छोटा मुलगा मोजतबा खामेनेई थोडक्यात बचावला. त्याच्या पायाला मार लागल्याची माहिती मिळत होती. त्यानंतर अमेरिकेने थेट मोजतबा खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले. त्यानंतर मोजतबा खामेनेई कोमात असल्याचीही जोरदार चर्चा रंगताना दिसली. मोजतबा खामेनेई यांच्यावर रशियात उपचार सुरू असल्याचाही दावा केला जात होता. त्यानंतर आता इराणकडून थेट जगाची झोप उडवण्यात आली. मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल विविध चर्चा सुरू असतानाच खास व्हिडीओ शेअर करण्यात आला. अमेरिकेसोबतच्या युद्धादरम्यान पहिल्यांदाच मोजतबा खामेनेई कॅमेऱ्यासमोर आल्याचे बघायला मिळाले.
मोजतबा खामेनेई यांचा खास व्हिडीओ घेण्यात आला. ज्यामध्ये ते आपल्या लष्करासोबत दिसत आहेत. व्हिडीओमध्ये मोजतबा खामेनेई चालत एका रूममध्ये जाताना दिसत आहेत. या रूममध्ये अगोदरच इराणी अधिकारी बैठकीसाठी बसल्याचे बघायला मिळत आहे. ज्या ठिकाणी मोजतबा खामेनेई पोहोचले आहेत, तिथे समोर मोठी स्क्रीन दिसत आहे, काहीतरी नकाशा आहे.
यासोबतच इराणचे ध्वजही तिथे दिसत आहेत. या व्हिडीओमुळे मोजतबा खामेनेई ठार झाल्याचा दावा करणाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लागले. मोजतबा खामेनेई जिवंत आहेत. या व्हिडीओनंतर नक्कीच अमेरिकेत खळबळ उडाली असेल. फक्त हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकरिता हा मोठा धक्का नक्कीच म्हणावा लागेल.
इराणला कोणी वाली राहिला नाही इराण युद्धात मागे पडला आहे. मोजतबा खामेनेई कोमात गेल्याचा दावा होत होता. मात्र, मोजतबा खामेनेई युद्धाच्या मैदानात थेटपणे मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. ही खाडी खुली करण्याकरिता मोठे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, इराण ठामपणे उभा आहे. त्यामध्येच मोजतबा खामेनेई यांचा व्हिडीओ पुढे आल्याने इराणला एक वेगळी ऊर्जा मिळाल्याचा दावा केला जात आहे.