
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत खळबळ उडाली आहे. इराणनेही अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना उत्तर दिले आहे. इराणने अमेरिकेच्या आखाती देशांमधील लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. तसेच इस्रायलमधीलही अनेक शहरांवर मिसाईल हल्ले झाले आहेत. अशातच आता युद्धभूमीतून अमेरिकेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इराणी हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत आणि पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकन सेंट्रल कमांडने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे 3 सैनिक ठार झाल्याची माहिती दिली आहे. मात्र या घटनेबाबत लष्कराने अधिक तपशील दिलेला नाही. अमेरिकन लष्कराने म्हटले आहे की इराणविरुद्धच्या ऑपरेशन एपिक फ्युरीमध्ये तीन सैनिक ठार झाले आणि पाच जण गंभीर जखमी झाले. इराणवर अमेरिका-इस्रायली संयुक्त हल्ल्यानंतर अमेरिकेला हा पहिला मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.
CENTCOM Update
TAMPA, Fla. – As of 9:30 am ET, March 1, three U.S. service members have been killed in action and five are seriously wounded as part of Operation Epic Fury.
Several others sustained minor shrapnel injuries and concussions — and are in the process of being…
— U.S. Central Command (@CENTCOM) March 1, 2026
सेंट्रल कमांडने सांगितले की, ‘अमेरिकेचे काही सैनिक श्रापनेलमुळे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुन्हा युद्धभूमीवर पाठवले जात आहे. मोठ्या लष्करी कारवाया सुरू आहेत आणि मदतकार्य सुरू आहे. लष्कराने सांगितले की. शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा आदर करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबियांना माहिती देणार आहोत. त्यानंतर 24 तासांपर्यंत आम्ही त्यांची माहिती जारी करू.’
अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर दुसऱ्या दिवशाही हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणी सैन्याने मध्यपूर्वेतील जहाजे आणि अमेरिकेला पाठिंबा असणाऱ्या देशांना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले आहे. इराणी हल्लात जेरुसलेमजवळील हल्ल्यात किमान आठ लोक ठार झाले आहेत अशी माहिती इस्रायलकडून देण्यात आली आहे. दरम्यान, इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्लात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. त्याच्यासह अनेक महत्त्वाचे नेते आणि अधिकारीही मारले गेल्याची माहिती समोर आली आहे.