खामेनी यांना संपवण्यासाठी मोठा प्लॅन, इस्रायल-इराण युद्धात लवकरच महाविध्वंस? 5 संकेत आले!

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. आता भविष्यात या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खामेनी यांना संपवण्यासाठी मोठा प्लॅन, इस्रायल-इराण युद्धात लवकरच महाविध्वंस? 5 संकेत आले!
| Updated on: Jun 17, 2025 | 3:45 PM

Israel And Iran War : सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध चांगलेच भडकले आहे. या युद्धात अन्य देशही उडी घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिका इस्रायलशी हातमिळवणी करून इराणवर मोठा हल्ला करणार का? असा प्रश्न विचारला जातोय. तर दुसरीकडे इराणचे शीर्षस्थ नेते अयातुल्ला खली खामेनी यांना संपवण्यासाठी इस्रायल तयारी करत आहे का? असाही सवाल उपस्थित झाला आहे. याच कारणामुळे इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध मोंठं विघातक रुप धारण करू शकण्याच्या पाच शक्यता जाणून घेऊ या…

डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात काय चाललंय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कॅनडात चालू असलेल्या जी-7 शिखर परिषदेला अर्ध्यात सोडून अमेरिकेत परतले आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी केलेल्या दाव्यानुसार इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प तातडीने अमेरिकेत परतले आहे. ट्रम्प यांनी मात्र मॅक्रॉन यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. तर माझं अमेरिकेत परतण्याचं कारण यापेक्षाही मोठं आहे, असं ट्रम्प म्हणालेत. त्यामुळेच आता इराण-इस्रायल यांच्या युद्धात अमेरिका काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एका अमेरिकी अधिकाऱ्यानुसार आता..

डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन येथे नॅशनल सिक्योरिटी काऊन्सिलची (एनएससी) बैठक बोलावली आहे. या बैठकीला संरक्षण विभागाचे सचिव हेगसेथ तसेच जॉइंट तिफ ऑफ स्टाफचे चेअरमन जनरल डॅन केम हे उपस्थित असणार आहेत. एका अमेरिकी अधिकाऱ्यानुसार आता इराणला एक शेवटची संधी दिली जाऊ शकते. त्यानंतर अमेरिका या युद्धात उडी घेण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या याच भूमिकेनंतर आता इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाचं नेमकं काय होणार? असं विचारलं जात आहे.

खामेनी यांच्या टॉप कमांडरची हत्या

इस्रायली सेनेने मंगळवारी मोठी घोषणा केली. मंगळवारी चाललेल्या हवाई ऑपरेशन्समध्ये इराणचे सर्वोच्च वरिष्ठ सैन्य अधिकारी अली शदमानी यांना मारून टाकण्यात आल्याचं इस्रायली सैन्याने सांगितले. इस्रायली सैन्यानुसार शदमानी हे खामेनी यांच्या सर्वाधिक जवळच्या सल्लागारांपैकी एक होते. या हत्येमुळे आता इराणी सैन्याला मोठा झटका बसला आहे.

तेहरानमध्ये दहशतीचं वातावरण

इस्रायलच्या हल्ल्यांनंतर आता तेहरानमध्ये दहशतीचं वातावरण आहे. लोक हे शहस सोडून पळून जात आहेत. तेथील करज-चालूस रस्त्यावर वाहनांची मोठी रांग लागली आहे. भारतीय दूतावासात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना तसेच मूळचे भारतीय असणाऱ्यांना इस्रायल सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या लोकांनी आम्हाला लवकरात लवकर संपर्क साधावा तसेच त्यांचे लोकेशन सांगावे, असे आवाहन तेहरानने केले आहे. त्यामुळे इराणमध्ये काहीतरी वेगळं होत आहे का? असा प्रश्न विचारला जातोय.

रशिया आणि चीनची संदिग्ध हालचाल

रशियन वृत्तपत्रांनुसार रशियाचे संरक्षण प्रमुख हे उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्याचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र या दौऱ्याला इस्रायल आणि इराण युद्धाशी जोडले जात आहे. दुसरीकडे चीननेही त्यांच्या नागरिकांना इस्रायल सोडण्याचे आवाहन केले आहे. चीन आणि रशिया या दोन्ही देशांच्या भूमिकेवरून इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा वैश्विक परिणाम होऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळेच आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठऱणार आहे.