इस्त्रायलच्या थेट हवाई हल्ल्याने मोठ्या युद्धाचा भडका, लेबनॉनमध्ये खळबळ; मोठी अपडेट समोर!

इस्रायलने लेबनॉनवर थेट हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये तीन मजली इमारत ध्वस्त झाली आहे. इस्रायलने इशारा दिल्यानंतर लेबनॉनमधील काही भाग रिकामा करण्यात आला होता.

इस्त्रायलच्या थेट हवाई हल्ल्याने मोठ्या युद्धाचा भडका, लेबनॉनमध्ये खळबळ; मोठी अपडेट समोर!
israel attack
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 06, 2026 | 8:24 PM

Israel Attack On Lebanon : इस्रायलच्या वायूसेनेने समोवारी रात्री उशिरा आणि मंगळवारच्या पहाटे 1 वाजता लेबनॉनवर हवाई हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलने लेबनॉनमधील दक्षिण आणि पूर्व लेबनॉनमधील काही भागांना लक्ष्य केलं आहे. दक्षिणेतील सिदोन शहरातील तीन मजली इमारतीवर इस्रायलने हल्ले केले आहेत. या हल्ल्यामध्ये तीन मजली इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. लेबनॉनचे प्रशासन हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेच्या निशस्त्रीकरणाच्या प्रक्रियेची माहिती इस्रायलला देणार आहे. लवकरच ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. असे असतानाच आता इस्रायलने हा हल्ला घडवून आणला आहे. त्यामुळे आता जगात खळबळ उडाली आहे.

इस्त्रायलचा इमारतीवर हल्ला

इस्रायलच्या हल्ल्यानंतर सध्या लेबनॉनमधील प्रभावग्रस्त भागाची स्थिती कशी आहे, याची माहिती तेथील एका फोटोग्राफरने दिली आहे. या माहितीनुसार इस्रायलने हल्ला केला ती एक व्यावसायिक इमारत होती. त्या इमारतीत काही दुकाने होती. तसेच ती इमारत रिकामी होती. एका व्यक्तीला रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात नेण्यात आले आहे तर अन्य लोकांचा शोध घेतला जात आहे. अद्याप तरी लोकांच्या मृत्यूची बातमी समोर आलेली नाही.

दक्षिण लेबनॉनच्या दोन गावांवरही हल्ले

इस्रायलचे लष्करविषयक प्रवक्ते अविचाई अद्राई यांनी एक्सवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी इस्रायल हल्ला करणार असल्याचे सांगिले होते. इस्रायलने दक्षिण लेबनॉनच्या दोन गावांवरही हल्ले केले आहेत. सिदोन येथील हल्ला मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आला आहे, असा दावा केला जातोय. या हल्ल्यानंतर मात्र इस्त्रायलने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

हमासच्या कमांडरच्या घरावर हल्ला

इस्रायलच्या या हल्ल्याबाबत लेबनॉनच्या शासकीय वृत्तसंस्थेने सविस्तर माहिती दिली आहे. इस्रायलने बेका खोऱ्यातील मनारा या गावातील एका घरावर हल्ला केला. हे घर हमासचा सैन्य कमांडर शरहाबील अल सय्यद याचे होते. 2024 सालातील मे महिन्यात इस्रायल ड्रोन हल्ल्यात तो मारला गेला होता. इस्रायलने हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर हा भाग रिकामा करण्यात आला होता. दरम्यान, आता इस्रायलच्या हल्ल्यानंतर पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.