
Israel Lebanon War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात शस्त्रसंधी झाली असून आता दोघांमधील युद्ध संपुष्टात आले आहे. विस्थापित पॅलेस्टिनी नागरिक आता आपापल्या घरी परतत आहेत. असे असतानाच आता एक युद्ध थांबलेले असले तरी आता इस्रायल शांत बसलायला तयार नाही. इस्रायलने आता नव्या देशावर थेट हल्ला केला आहे. इस्रायलच्या या हल्ल्यामुळे आता लेबनॉनदेखील आक्रमक पवित्रा धारण करण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले केल्यानंतर इस्रायली सैन्याने आपली भूमिकादेखील स्पष्ट केलेली आहे. दक्षिण लेबलॉननमध्ये हिजबुल्लाह या दहशतादी संघटनेच्या तळाव हल्ले करण्यात आले आहेत. हिजबुल्लाहकडून दहशतवादी कारवाया करण्यासाठी तयारी केली जात होती. त्यासाठी अनेक इंजिनिअरिंग उपकरणं, मशीन्स जमा करण्यात आले होते. इस्रायली सैन्याच्या उत्तरी नेतृत्त्वाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. लष्कराने ज्या ठिकाणी हल्ले केले, त्या ठिकाणी हिजबुल्लाहने आपल्या मशिनरी ठेवलया होत्या. दक्षिण लेबनॉनमध्ये दहशतादी कारवाया करण्यासाठी तयारी केली जात होत, असा दावा इस्रायली सैन्याने केला आहे.
हिजबुल्लाह लेबनॉनच्या नागरिकांचे आयुष्य धोक्यात टाकत आहे. इस्रायलकडून जे कृत्य केले जात आहे, त्यामुळे इस्रायल-लेबनॉन कराराचे उल्लंघन केले जात आहे, असेदेखील इस्रायलने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला लेबनॉनच्या अल- नजरियाह या गावात झाला आहे. हा हल्ला झाल्यानंतर त्याच काही दृश्ये हिजबुल्लाहशी संबंधित असणाऱ्या अल मनार टीव्ही चॅनेलवर दाखण्यात आली आहेत.
इस्रायलच्य या हल्ल्यात एका लेबनॉनच्या नागरिकाचा मृत्यू झाला आहे तर दोघे जखमी आहेत. लेबनॉनच्या राष्ट्रपतींनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. हिजबुल्लाहच्या या कारवाया थांबवण्यासाठी आम्ही भविष्यातही अशा कारवाया करत राहू, असा इशारा इस्रायलने दिला आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? लेबनॉन जशास तसा हल्ला करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.