AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणनंतर आता ‘या’ देशावर इस्रायलचा हवाई हल्ला, युद्ध पुन्हा सुरु होणार?

इराण आणी इस्रायल यांच्यातील युद्ध युद्धबंदीनंतर थांबले आहे. आता इस्रायलने आणखी एका देशावर हल्ला केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराणनंतर आता 'या' देशावर इस्रायलचा हवाई हल्ला, युद्ध पुन्हा सुरु होणार?
israel lebanaon
| Updated on: Jun 27, 2025 | 4:01 PM
Share

इराण आणी इस्रायल यांच्यातील युद्ध युद्धबंदीनंतर थांबले आहे. 12 दिवसांच्या या युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अशातच आता इस्रायलने आणखी एका देशावर हल्ला केला आहे. शुक्रवारी सकाळी इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये हवाई हल्ले केले. यामुळे परिसरात स्फोटांचे आवाज ऐकू आले, तसेच या हल्ल्यांमुळे सर्वत्र धुर पसरला होता. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इस्रायलने केलेल्या हल्ल्यांबाबत प्रत्यक्षदर्शींनी शफाक न्यूजशी बोलताना सांगितले की, ‘या भागात अनेक मोठे स्फोट ऐकू आले, तसेच इस्रायली लढाऊ विमाने आकाशात घिरट्या घालत होते. तसेच दक्षिण लेबनॉनच्या अनेक भागात ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोणत्या ठिकाणी हल्ले?

लेबनॉन मधील हल्ल्यांबाबत बोलताना इस्रायली सैन्याने सांगितले की, ‘हिजबुल्लाहच्या कारवाया थांबवण्यासाठी हे हल्ले करण्यात आले आहेत. दक्षिण लेबनॉनमधील नबातियाह अल-फौका आणि इकलीम अल-तुफाहच्या टेकड्यांवरील बऱ्याच ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत. हिजबुल्लाहच्या पायाभूत सुविधा आणि त्यावर काम करणाऱ्या लोकांना टार्गेट करण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

शफाक न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली हवाई दलाने दक्षिण लेबनॉनमधील माउंट शुकेफ परिसरात असणाऱ्या हिजबुल्लाहच्या गुप्त लपण्याच्या ठिकाणाला टार्गेट केलं. हे ठिकाण फायर कंट्रोल आणि सुरक्षेचे नियंत्रण करण्यासाठी वापरले जात होते. या ठिकाणावर आधीही इस्रायली सैन्याने हल्ला केला होता, यात ते उद्धवस्त झाले होते मात्र आता त्याचे बांधकाम पुन्हा सुरु करण्यात आले होते, त्याच ठिकाणी हा हल्ला करण्यात आला.

आम्ही झुकणार नाही – हिजबुल्लाह

इस्रायली हल्ल्याच्या एक दिवस आधी हिजबुल्लाहचे उपप्रमुख शेख नईम कासिम यांनी इस्रायला स्पष्ट इशारा दिला होता. लेबनॉन कोणाच्याही दबावाखाली येणार नाही. हा आमचा देश आहे, आम्हाला तो हवा आहे आणि आम्ही त्यासाठी लढू असं कासिम यांनी म्हटलं होतं.

युद्धबंदीनंतरही इस्रायलचे हल्ले

27 नोव्हेंबर 2024 रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी करार झाला होता, मात्र त्यानंतरही इस्रायल लेबनॉनमध्ये नियमित हल्ले करत आहे. याआधी गुरुवारी झालेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आजही (शुक्रवार) पुन्हा हल्ले झाले आहेत. या हल्ल्यामुळे दक्षिण लेबनॉनमध्ये तणाव वाढला आहे.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.