AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War : संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावावर भारताने का केले नाही मतदान, पाहा काय होते कारण

Isrel-Hamas war update : इस्रायल आणि हमास यांच्या सुरु असलेल्या युद्धाबाबत जॉर्डनने संयुक्त राष्ट्रात ठराव मांडला. पण या ठरावावर भारताने मतदान केले नाही. भारतासह अनेक देशांनी यात भाग घेतला नाही. भारताने असे का केले नाही. काय होते कारण. जाणून घ्या.

Israel-Hamas War : संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावावर भारताने का केले नाही मतदान, पाहा काय होते कारण
united-nations
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 28, 2023 | 1:29 PM
Share

Israel-Hamas War : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास विरुद्ध इस्रायल युद्धाचा शनिवार हा 22 वा दिवस आहे. हा संघर्ष आता अधिक चिघळत चालला आहे. या संघर्षाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत चर्चा सुरू आहे. गाझामधून इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने हमास विरुद्ध युद्धाची घोषणा केली. हमासला संपवल्याशिवाय शांत बसणार नाही. युद्ध जरी त्यांनी सुरु केले असले तरी ते आम्हीच संपवणार असल्याचं इस्रायलच्या पंतप्रधानांनी आधीच स्पष्ट केले आहे.

युद्धविराम करण्याची मागणी

मानवतावादी मदत पोहोचवण्यासाठी इस्रायल-हमास लढाईत तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी करणारा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मांडण्यात आला. भारताने या ठरावावर मतदान केले नाही. याचे कारण हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा उल्लेख ठरावात नव्हता.

संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या उपराजदूत योजना पटेल यांनी इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. दहशतवादाचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. पटेल यांनी ओलिसांची तात्काळ सुटका करण्याचे आवाहन केले. तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.

जॉर्डनने मांडला प्रस्ताव

युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली (UNGA) चे 193 सदस्य देश इस्रायल-हमास युद्धासंदर्भात बोलावलेल्या 10व्या आपत्कालीन विशेष सत्रात सहभागी झाले होते. यावेळी जॉर्डनने एक प्रस्ताव मांडला. बांगलादेश, मालदीव, पाकिस्तान, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेसह 40 हून अधिक देशांनी याला अनुमोदन दिले. या ठरावावर मतदान झाल्यावर भारताने अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.

14  देशांचा प्रस्तावाच्या विरोधात मतदान

120 देशांनी ठरावाच्या बाजूने तर 14  देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. 45 देश अनुपस्थित राहिले. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, जपान, युक्रेन आणि ब्रिटनने मतदानापासून दूर राहिले. जॉर्डनने तयार केलेल्या ठरावात हमास या दहशतवादी संघटनेचा उल्लेख नव्हता. यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?