युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांचे ‘स्पर्म’ इस्त्रायल का ठेवतोय सुरक्षित? काय होणार फायदा?

Israel-Hamas War: शुक्राणू काढण्याबरोबर अजून एक मोहीम इस्त्रायलमध्ये सुरु आहे. युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांच्या शुक्राणूपासून नवीन जीवाला जन्म देणे हा उद्देश या मोहिमेमागे आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अनेक महिला आणि मुली पुढे येत आहे. त्यांनी सैनिकांच्या मुलांना जन्म देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांचे स्पर्म इस्त्रायल का ठेवतोय सुरक्षित? काय होणार फायदा?
इस्त्रायल हमास युद्धामुळे शुक्राणू सुरक्षित ठेवले जात आहे.
| Updated on: Aug 08, 2024 | 2:35 PM

Israel-Hamas War: इस्त्रायल सध्या चौफर असलेल्या शत्रूनी घेरला गेला आहे. हिजबुल्लाहकडून इस्त्रायलवर हल्ले होत आहे. त्याल इस्त्रायल तोडीस तोड उत्तर देत आहे. त्यानंतर इराणमध्ये घूसन हिजबुल्लाच्या टॉप कमांडरचा खात्मा केला. त्यानंतर इराणकडून प्रत्युत्तर देण्याची तयारी केली जात आहे. इराण आणि लेबेनॉन इस्त्रायलवर हल्ले करण्याच्या धमक्या देत आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत ४० हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये 700 हून अधिक इस्रायली सैनिकांचाही समावेश आहे. इस्त्रायली सरकार आता युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांचे शुक्राणू (‘स्पर्म’ ) जपून ठेवत आहे.

170 इस्रायली सैनिक शुक्राणू संकलित

इस्त्रायली सरकार युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांचे शुक्राणू जपत आहे. आतापर्यंत 170 इस्रायली सैनिक आणि नागरिकांचे शुक्राणू संकलित करण्यात आले आहेत. इस्रायली सरकारकडून असा निर्णय का घेण्यात आला? हा प्रश्न पडला असणार…

इस्त्रायल सरकारच्या या रणनीतीमागे विशेष कारण आहे. या शुक्राणूंच्या माध्यमातून भविष्यात मुले जन्माला येऊ शकतात. द इस्त्रायल टाईम्सच्या वृत्तानुसार, एका सैनिकाचा मृत्यू झाल्यानंतर आर्मी लगेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांना कळवते. त्या कुटुंबियाना त्या सैनिकाचे शुक्राणू जपून ठेवायचे का? असे विचारते. त्याच्या कुटुंबियांनी लेखी संमती दिल्यानंतर शुक्राणू काढले जातात. गेल्या काही महिन्यांत शुक्राणू जपवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहेत.

आणखी एक अशी मोहीम

शुक्राणू काढण्याबरोबर अजून एक मोहीम इस्त्रायलमध्ये सुरु आहे. युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांच्या शुक्राणूपासून नवीन जीवाला जन्म देणे हा उद्देश या मोहिमेमागे आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अनेक महिला आणि मुली पुढे येत आहे. त्यांनी सैनिकांच्या मुलांना जन्म देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मृत्यूनंतर कसे काढतात शुक्राणू

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, मृत्यूनंतर शुक्राणू काढण्यासाठी अंडाशयात चीरा लावला जातो. त्यातील सेलचा एक लहान भाग काढला जातो. त्या सेलमधून जिवंत शुक्राणू काढून प्रयोगशाळेत ठेवले जातात. मृत्यूनंतर 24 तासांत ही प्रक्रिया करावी लागते.