जगासाठी धोक्याची घंटा, थेट इराणला सोडून इस्त्रायलने केला या देशावर बॉम्ब हल्ला, मोठी खळबळ..

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे. या युद्धाची आग सर्वांनाच बसत आहे. यादरम्यानच इस्त्रायलकडून घातक निर्णय घेण्यात आला. इराणला सोडून थेट दुसऱ्या एका देशावर मोठा हल्ला इस्त्रायलने केला. ज्याने आता खळबळ उडाली.

जगासाठी धोक्याची घंटा, थेट इराणला सोडून इस्त्रायलने केला या देशावर बॉम्ब हल्ला, मोठी खळबळ..
Iran bomb attack
| Updated on: Mar 20, 2026 | 1:07 PM

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. तिन्ही देश हार स्वीकारत नाहीत. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांचेच युद्धात नुकसान होत आहे, असे अजिबात नाही. या युद्धाच्या आगीत जगातील जवळपास सर्वच देश होरपळत आहेत. थेटपणे फटका बसत आहे. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचले. कोणत्याही परिस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आणण्याची मागणी केली जात आहे, पण युद्ध भडकताना दिसतंय. अमेरिकेने इराणसोबत युद्ध करून स्वत: च्याच पायावर दगड मारून घेतला आहे पण त्यांच्या निर्णयाने आखाती देशांचे तीनतेरा वाजले. इराणच्या गॅस प्रकल्पावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर इराण पेटून उठला आणि थेट कतार आणि यूएईच्या गॅस प्रकल्पांवर मोठे हल्ले करत सर्वकाही पेटवून दिले. त्यानंतर अमेरिकेकडून सांगण्यात आले की, इराणच्या ऊर्जा संबंधित गोष्टींवर इस्त्रायल हल्ला करणार नाही आणि या हल्ल्याबाबत आम्हाला कल्पना नव्हती.

होर्मुज खाडीच्या मुद्द्यात अमेरिकेने यापूर्वीच अनेक देशांना ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक देश यापासून दूर राहत आहे. अमेरिकेने चीन, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, दक्षिण कोरिया यासारख्या देशांना होर्मुज खाडीत युद्धनाैका पाठवण्याची विनंती केली, पण एकही देश अमेरिकेच्या मदतीकरिता पुढे आला नाही. सर्वांनीच हात वर केले. इस्त्रायलकडूनही मोठे हल्ले केले जात आहेत.

नुकताच इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. हैराण करणारी बाब म्हणजे इस्त्रायलच्या निशाण्यावर यावेळी इराण नव्हते तर इस्त्रायलकडून थेट दक्षिण सीरियावर हल्ला करण्यात आला. दक्षिण सीरियातील सीरियन राजवटीच्या लष्करी पायाभूत सुविधांवर थेट मोठा हल्ला इस्त्रायलकडून करण्यात आला. इस्रायली संरक्षण दलाने रात्रीच्या वेळी दक्षिण सीरियातील सीरियन लष्करी तळांवरील एक कमांड सेंटरवर आणि लढाऊ उपकरणांना टार्गेट करून हल्ला केला.

इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली. अस-सुवैदा परिसरात द्रुझ नागरिकांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इराणवर हल्ला करता करता थेट इराकला इस्त्रायलने टार्गेटवर घेतले. सध्याची परिस्थिती बघता हे युद्ध अधिक भडकण्याचे मोठे संकेत आहेत.

Follow Us