AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाचे टेन्शन वाढले! मोठा हाहाकार, अमेरिकेने उचलले घातक पाऊल, थेट इराणच्या दिशेने…

इराण आणि अमेरिका युद्ध अधिक पेटण्याचे मोठे संकेत आहेत. आता अमेरिकेकडून धक्कादायक पाऊल उचलण्यात आले. अमेरिकेने घेतलेल्या निर्णयामुळे जगात हाहाकार उडाल्याचे बघायला मिळत आहे. युद्ध अधिक वाढण्याची शक्यता आहे.

जगाचे टेन्शन वाढले! मोठा हाहाकार, अमेरिकेने उचलले घातक पाऊल, थेट इराणच्या दिशेने...
US Navy
| Updated on: Mar 20, 2026 | 12:34 PM
Share

अमेरिका आणि इराण युद्धाला 20 दिवस पूर्ण झाली. ज्यावेळी युद्ध सुरू झाले, त्यावेळीच सांगण्यात आले होते की, युद्ध काही दिवस चालेल. मात्र, युद्धाला 20 दिवस पूर्ण झाले आणि सर्व जग संकटात सापडले. या युद्धाचा परिणाम फक्त अमेरिका, इराण आणि इस्त्रायलपुरताच मर्यादित राहिला नसून सर्वच देश भरडले जात आहेत. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जगाचे टेन्शन वाढले. अमेरिकेकडून होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. मात्र, त्यांना यश मिळत नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठा दबाव कुठे ना कुठे अमेरिकेवर आहे. जगातील अनेक देश या युद्धात अमेरिला दोष देत आहेत. यादरम्यानच आता अमेरिकेकडून मोठे पाऊस उचलण्यात आले. इराणला घेरण्याची सर्व तयारी अमेरिकेकडून करण्यात आली. त्यामध्येच आता काहीतरी भयंकर घडणार हे स्पष्ट आहे.

अमेरिकी मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिका आता वेगाने हजारो मरिनला मध्य पूर्वेकडे पाठवत आहे. बॉक्सर अँफिबियस रेडी ग्रुप आणि 11 वे मरीन एक्सपेडिशनरी युनिट इराणच्या दिशेने रवाना झाले. मिळालेली अधिक माहिती अशी की, ही जहाजे इंडो पॅसिफिक मार्गाने मध्य पूर्वेत पोहोचतील. नौदलाला पूर्णपणे अमेरिकेकडून तयार करण्यात आले.

या तीन युद्धनाैक्यामध्ये एकून 2500 मरीन सैनिक असल्याची माहिती आहे. तीनही युद्धनाैका एफ-35 लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि उभयचर युद्धसामग्रीने पूर्णपण सज्ज आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्धात या युद्धनाैका मारा करू शकतात. या अत्यंत अत्याधुनिक युद्धनाैका आहेत. तिन्ही युद्धनाैका थेट जमिनीवर उतरूनही हल्ला करू शकतात.

हे युद्ध सुरू करण्याअगोदर अमेरिकेला वाटले होते की, इराण हे युद्ध लवकर हारेल. पण इराण ज्यापद्धतीने हल्ले करत आहेत, त्यानंतर अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे कळत आहे. मात्र, अमेरिकेच्या या निर्णयामुळे युद्ध अधिक चिघळण्याची दाट शक्यता आहे. या युद्धाचा 20 दिवसांमध्येच मोठा फटका बसलेला असताना आता पुन्हा अमेरिका आपली मोठी शक्ती दाखवण्याचा तयारीत आहेत. अजून जगावर नक्की काय काय संकटे ओढावतात, यावरून सर्वजण चिंतेत आहेत.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!