AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan-Mossad : अमेरिकेच्या आशिर्वादाने एका मोठ्या मिशनसाठी पाकिस्तान-मोसाद आले एकत्र, पडद्यामागचा मोठा खेळ

Pakistan-Mossad : आंतरराष्ट्रीय राजकारणात परिस्थिती आणि गरजेनुसार काहीही घडू शकतं. वाचल्यावर तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, पण भारताचा सच्चा मित्र अशी ओळख असलेल्या इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद आणि पाकिस्तान एका मोठ्या मिशनसाठी एकत्र आले आहेत. महत्त्वाच म्हणजे यामध्ये त्यांना अमेरिकेचा आशिर्वाद आहे. हे मिशन काय आहे? जाणून घ्या.

Pakistan-Mossad : अमेरिकेच्या आशिर्वादाने एका मोठ्या मिशनसाठी पाकिस्तान-मोसाद आले एकत्र, पडद्यामागचा मोठा खेळ
Israel-Pakistan
| Updated on: Aug 08, 2025 | 9:23 AM
Share

इस्रायल आणि मोसादची नेहमीच जगभर चर्चा असते. मोसाद ही इस्रायलची गुप्तचर संघटना आहे. इस्रायलचा शत्रू जगाच्या पाठिवर कुठेही असो, मोसाद त्याला सोडत नाही. हा मोसादचा इतिहास राहिला आहे. दोन महिन्यांपूर्वी इराण-इस्रायल युद्धात मोसादने आपली क्षमता दाखवून दिली. मोसाद ही इस्रायलच्या सुरक्षेचा कणा मानली जाते. मोसादने आतापर्यंत अनेक कठीण मानल्या जाणाऱ्या ऑपरेशन्सना प्रत्यक्षात आणलय. मोसादची हीच खासियत त्यांना इतरांपेक्षा घातक बनवते. आता मोसाद आणि पाकिस्तान एका मिशनसाठी एकत्र आले आहेत. वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. मोसाद आणि पाकिस्तान एकत्र. कारण इस्रायल आणि पाकिस्तानमध्ये फार सलोख्याचे संबंध नाहीयत. पाकिस्तानने नेहमीच इस्रायलला विरोध केला आहे.

मोसाद आणि पाकिस्तान एकत्र आलेत त्यामागे कारण आहे इराण. पाकिस्तान आपली सवय आणि स्वभावाप्रमाणे इराणच्या पाठित खंजीर खुपसणार आहे. त्यासाठी पडद्यामागे मोठी तयारी सुरु आहे. इराणमध्ये खामेनेईच्या सत्तेचा अंत होऊ शकतो. इराणमध्ये आधीपासूनस सक्रीय असलेली मोसाद यासाठी Active झाली आहे. इस्रायलला त्यांच्या या प्लानसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. इराणमधील सरकार अस्थिर करुन खामेनेईला सत्तेतून हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इराणमध्ये शस्त्रास्त्र पाठवली जात आहेत. मोसादने यासाठी पाकिस्तानची मदत घेतली आहे. अलीकडेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पकडण्यात आला. त्यातून काही गोष्टी समोर आल्या.

मोसादचा प्लान काय?

खामेनेईला मार्गातून हटवल्यानंतरच मध्य पूर्वेत शांतता येऊ शकते असं नेतन्याहू आणि ट्रम्प यांचं मत आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायलचे संरक्षण मंत्री अमेरिकी दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी या प्लानला मंजुरी मिळाली. इराणमध्ये सत्तापालट घडवून आणायचा किंवा खामेनेईची हत्या यावर दोन्ही देशांच एकमत आहे. त्यासाठी मोसादने प्लान तयार केलाय.

पाकिस्तानचा असा वापर होतोय

यात खास बाब म्हणजे इराणचा जवळचा मित्र बनलेला पाकिस्तानच्या मार्गाने इराणमध्ये शस्त्र पोहोचवली जात आहेत. सरकार अस्थिर करण्याचा यामागे उद्देश आहे. सिस्तान आणि बलूचिस्तानमध्ये इराणच्या गुप्तचर शाखेच्या टीमने मोठ्या प्रमाणात अशी शस्त्रास्त्र पकडली आहेत. पाकिस्तानच्या माध्यमातून मोसाद इराणमध्ये अमेरिकी शस्त्रास्त्र पाठवत आहे.

अल मायादीनचा रिपोर्ट काय?

अल मायादीनच्या एका रिपोर्टनुसार, इराणच्या गुप्तचर खात्याने सिस्तान आणि बलूचिस्तान प्रांतात तस्करीच्या मार्गाने आलेला शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. यात बहुतांश शस्त्र अमेरिकी आहेत. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादशी संबंधित समूह ही तस्करी करतोय असा दावा करण्यात आला आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.