इस्रायलचा थक्क करणारा कारनामा, युद्धासाठी दुसऱ्या देशात अख्खा सिक्रेट बेस उभारला, पण त्या देशालाच हे माहितच नव्हतं

Israel Secret Military Base : इस्रायलची सैन्य ऑपरेशन्स ही थक्क करणारी असतात. आता सुद्धा असाच एक कारनामा समोर आलाय. इराण विरुद्ध लढण्यासाठी इस्रायलने दुसऱ्या देशात एक अख्खा सिक्रेट बेस उभा केला. पण त्या देशाला इस्रायलचा असा कुठला बेस आपल्या देशात आहे हे माहितच नव्हतं.

इस्रायलचा थक्क करणारा कारनामा, युद्धासाठी दुसऱ्या देशात अख्खा सिक्रेट बेस उभारला, पण त्या देशालाच हे माहितच नव्हतं
Israel Secret Military Base
Image Credit source: Getty Images.
| Updated on: May 11, 2026 | 3:33 PM

इस्रायलने आतापर्यंत अशी अनेक मिलिट्री ऑपरेशन्स केली आहेत, ज्याने जगाला थक्क करुन सोडलं आहे. आता इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धातही इस्रायलचा असाच एक कारनामा समोर आलय. खरंच ही खूप मोठी कामगिरी आहे. इस्रायलने इराकच्या पश्चिम वाळवंटात एक लष्करी तळ उभारला होता. महत्वाचं म्हणजे इराकला हे माहितच नव्हतं. इराण विरुद्ध युद्ध सुरु असताना इस्रायलकडून या बेसचा वापर सुरु होता. इराण विरुद्ध हवाई लढाईत मदत करण्यासाठी म्हणून हा बेस बनवण्यात आलेला. युद्ध सुरु होण्याआधी इस्रायलने इराकच्या पश्चिम वाळवंटात असा बेस उभार केला. अमेरिकेला या बद्दल माहित होतं. पण इराकला याची कल्पना सुद्धा नव्हती. इराक आणि इस्रायल परस्परांचे कट्टर विरोधक देश आहेत. दोन्ही देशांमध्ये तीव्र मतभेद आहेत. इराक इस्रायलला मान्यता देत नाही. पण इस्रायलने त्यांच्या देशात जाऊन असा बेस उभा केलाय याची इराकला पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती.

या बेसवर इस्रायलच्या स्पेशन फोर्सेसचे जवान तैनात होते. इस्रायली एअरफोर्ससाठी लॉजिस्टिकल हब म्हणून या तळावरुन काम चालायचं. आता हे समजल्यानंतर इराकचे नेते आणि लोक हैराण झाले आहेत. पश्चिम इराकमध्ये एक दिवस एका मेंढपाळाच्या नजरेने काही गोष्टी हेरल्या. त्याला ते खूप विचित्र वाटलं. हेलिकॉप्टर खूप कमी उंचीवरुन उड्डाण करताना त्याने पाहिलं. पाहताना ते इराकी हेलिकॉप्टर वाटत नव्हतं. उत्सुक्तेपोटी तो त्या हेलिकॉप्टरच्या दिशेने गेला. वाळवंटातील निर्जन स्थळी आल्यानंतर त्याला इस्रायलचा हा सिक्रेट तळ दिसला.

या बेसमागे दूरदृष्टीचा विचार काय?

वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. इराण विरुद्ध आपलं हवाई अभियान मजबूत करण्यासाठी इस्रायलने हा बेस उभारलेला. इस्रायली विमान शत्रुच्या प्रदेशात कोसळलं, तर लगेच त्या वैमानिकापर्यंत मदत पोहोचवता आली पाहिजे हा दूरदृष्टीचा विचार करुन हा बेस उभारण्यात आलेला.

इराणपासून अवघ्या 1000 हजार मैल अंतरावर

खास बाब म्हणजे हे सिक्रेट तळ इराणपासून अवघ्या 1000 हजार मैल अंतरावर होता. त्यामुळे इस्रायलला इराण विरुद्ध कारवाई करणं अजून सोपं झालं. रिपोर्ट्नुसार इस्रायलच्या या सिक्रेट मिलिट्री बेस बद्दल समजल्यानंतर इराकी सैन्याने तपासासाठी आपले सैनिक पाठवले. पण इस्रायली एअर फोर्सने त्यांच्यावर हल्ला केला. यात एका सैनिकाचा मृत्यू झाला. दोघे जखमी झाले. त्यानंतर इराकने आणखी दोन सैन्य युनिट्स पाठवल्या. ते पुरावे घेऊन आले. पण आता हा तळ रिकामी झाला आहे.

 

Follow Us