AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण अमेरिका युद्धाबाबत अत्यंत मोठी घोषणा, युद्ध कधी थांबणार थेट सांगितले स्पष्ट, इस्त्रायल..

इराण आणि अमेरिका युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच इराणला प्रस्ताव अमेरिकेने नाकारला आहे. युद्ध थांबावे, ही जगाची भूमिका असतानाच आता धक्कादायक घटना घडली. इस्त्रायलकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आले की, युद्ध नक्की कधी थांबणार.

इराण अमेरिका युद्धाबाबत अत्यंत मोठी घोषणा, युद्ध कधी थांबणार थेट सांगितले स्पष्ट, इस्त्रायल..
Benjamin Netanyahu
| Updated on: May 11, 2026 | 9:23 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात भडका उडाला आहे. इराणचा प्रस्ताव अमेरिकेने नाकारला. इराणचा यानंतर थयथयाट बघायला मिळाला. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबले पाहिजे, याकरिता जग आग्रही आहे. युद्धबंदीचा प्रस्ताव नाकारताच एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. यासोबतच आता इस्त्रायलने इराणला अत्यंत मोठा इशारा दिला. पाकिस्तान इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात मध्यस्थी करत आहे. मात्र, यश मिळत नाही. तुर्की सारखे तेल मध्यस्थीकरिता मैदानात आहेत. मात्र, युद्ध कमी व्हायचे सोडून अधिक भडकताना दिसत आहे. होर्मुज खाडीतील तणाव कमी होत नाही. होर्मुज खाडीत मोठा तणाव असून पूर्ण खाडी ठप्प आहे. भारतासह अन्य देशांचे तेल जहाज तिथे अडकून पडली आहेत. थेट हल्ले केले जात आहेत.

यादरम्यान आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोठा इशारा दिला. बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले की, जोपर्यंत इराणचे समृद्ध युरेनियम हटवले जात नाही आणि त्यांची अणु ठिकाणे नष्ट केली जात नाहीत, जोपर्यंत हे युद्ध थांबणार नाही. इराणने कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचे युरेनियम हटवले पाहिजे. त्याच्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

बेंजामिन नेतान्याहू यांनी पुढे म्हटले की, इराणचे आण्विक साहित्य हा सर्वात मोठा मुद्दा आहे. थेट कारवाई किंवा तडतोडीमधूनच मार्ग निघू शकतो. यादरम्यान त्यांनी लष्करी पर्यायांवर भाष्य करणे टाळले. इराण आपले अणू साठे हटवण्यास तयार नाही. यासोबतच इराणच्या याकरिता काही महत्वाच्या अटी देखील आहेत. याच मुद्द्यामुळे युद्धविराम होऊ शकत नाही.

अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यादरम्यान झालेल्या नुकसानाचीही भरपाई करून देण्याची मागणी इराणकडून केली जात आहे. युद्धविरामकरिता प्रस्ताव दिला जात आहे. मात्र, त्यातून कोणताही मार्ग निघत नाही. जगाला सध्याच्या घडीला फक्त आणि फक्त शांती हवी आहे. मात्र, बेंजामिन नेतान्याहू यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिल्याचे बघायला मिळतंय. इराण देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल