AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला ज्याची भीती तेच घडले, उडाला भडका, थेट हाहाकार, तो प्रस्ताव नाकारताच..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठा दणका बसल्याचे बघायला मिळत आहे. युद्ध थांबण्याची आशा असताच दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा एकदा फिसकटली आहे. पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत.

भारताला ज्याची भीती तेच घडले, उडाला भडका, थेट हाहाकार, तो प्रस्ताव नाकारताच..
crude oil
| Updated on: May 11, 2026 | 8:35 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. काही देश युद्ध थांबवण्याकरिता मैदानात उतरले. दोन्ही देशांना शांतत प्रस्ताव दिला जात आहे. मात्र, नुकताच पुन्हा एकदा युद्धविरामाचा प्रस्ताव दोन्हीकडून नाकारण्यात आला. मात्र, दोन्ही देशांनी प्रस्ताव नाकारल्याने आणि एकमत न झाल्याने कच्चा तेलाच्या किमतीत प्रति बॅरल 3 डॉलरने वाढ झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाची किमत जगाला मोजावी लागत आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर मोठा हल्ला केला. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ युद्धाला झाला. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच दोन्ही देशांमध्ये एकमत झाले नसल्याने युद्धविरामाची आशा पार मावळली आहे. दुसरीकडे प्रस्ताव नाकारताच कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या. ऊर्जेचे एक संकट निर्माण झाले.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव संपवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. शांततेचा मार्ग निघेल अशी आशा जगाला होती. मात्र, प्रत्यक्षात उलटे घडले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्या शांततेच्या प्रस्तावाची वाट पाहत होते, तो इराणकडून आला आहे. यासोबतच अमेरिकेने दिलेल्या शांतता प्रस्तावाला इराणकडूनही केराची टोपली दाखवण्यात आली. इराणकडून देण्यात आलेल्या प्रस्तावानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले.

इराणने अमेरिकेच्या प्रस्तावाला प्रत्युत्तर दिले. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, या ठरावात लेबनॉनमधील संघर्ष थांबवण्यावर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीवर भर देण्यात आला. मात्र, अमेरिकेने या प्रस्ताव धुडकावून टाकला. जगाला अमेरिका आणि इराण एकत्र येत युद्धबंदीची घोषणा करतील, अशी आशा होती. प्रत्यक्षात उलटेच घडले.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवण्याकरिता अनेक देश पुढे आली आहेत. मात्र, कोणालाही यश मिळत नाहीये. युद्ध थांबत नसल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्याचे बघायला मिळतंय. बैठक फिसकताच तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. होर्मुज खाडी बंद असल्याने एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. युद्धातून मार्ग निघण्याऐवजी युद्ध अधिक चिघळत आहे.

Follow Us
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं