AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इराणला समजणार नाही काय अन् कसे झाले…’, इस्त्रायलकडून ईराणला अल्टीमेटम, बायडेन अन् नेतन्याहू यांची चर्चा

israel iran attack: जो कोणी आमच्यावर हल्ला करेल त्याला खूप दुखापत होईल आणि त्याला किंमत मोजावी लागेल. आमचा हल्ला प्राणघातक आणि अचूक असेल. ते इराणसाठी धक्कादायक असणार आहे. इराणला काय झाले ते समजणार नाही, ते फक्त विनाश पाहतील

'इराणला समजणार नाही काय अन् कसे झाले...', इस्त्रायलकडून ईराणला अल्टीमेटम, बायडेन अन् नेतन्याहू यांची चर्चा
जो बायडेन आणि नेतन्याहू
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 10, 2024 | 12:30 PM
Share

मागील आठवड्यात इस्त्रायलवर इराणने सरळ हल्ला केला होता. त्यानंतर आधीच अशांत असलेल्या मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. आता इस्रायलने बदला घेण्याचा निर्णय घेतला आहे. इस्त्रायल इराणवर कधीही मोठा हल्ला करू शकतो. इस्रायल इराणच्या तेल केंद्रांना लक्ष्य करण्याचा विचार करत आहे. दुसरीकडे अमेरिका परिस्थिती निवाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली. आता इस्त्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांनी ईराणवर घातक हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले इराणवरील हल्ला हा घातक, अचूक आणि आश्चर्यकारक असणार आहे.

बायडेन आणि नेतन्याहू यांच्या तणाव?

जो बायडेन आणि नेतन्याहू यांच्यात ऑगस्ट महिन्यानंतर पहिल्यांदा चर्चा झाली. आता इस्त्रायलसोबत ईराण अन् हिजबुल्लाह यांच्यातील युद्धाची तीव्रता वाढली आहे. तसेच दोन्ही देशांकडून माघारीचे कोणतेही संकेत नाही. बायडेन आणि नेतन्याहू यांच्यात चर्चा झाली तेव्हा अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस त्या ठिकाणी होत्या. मागील काही दिवसांपासून बायडेन आणि नेतन्याहू यांच्यातील संबंधसुद्धा तणावाचे बनल्याची चर्चा आहे.

बायडेन संतापले होते…

इस्रायलने गाझामधील युद्ध ज्या पद्धतीने हाताळले आहे आणि हमास, हिजबुल्लाहशी संघर्ष सुरु आहे, त्यामुळे तणाव वाढला आहे. पत्रकार बॉब वुडवर्ड यांनी त्यांच्या पुस्तकात याबाबत उल्लेख केला आहे. त्यांनी एका अहवालाचा आधार देत म्हटले आहे की, जुलैमध्ये बेरूतजवळ आणि इराणमध्ये इस्त्रायली हल्ल्यांनंतर बायडेन यांनी नेतन्याहूवर कोणतीही रणनीती नसल्याचा आरोप केला. तसेच ते संतापलेसुद्धा होते.

इराणसाठी धक्कादायक असणार

इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला होतो. तो अयशस्वी ठरल्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री गॅलंट यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटले की, “जो कोणी आमच्यावर हल्ला करेल त्याला खूप दुखापत होईल आणि त्याला किंमत मोजावी लागेल. आमचा हल्ला प्राणघातक आणि अचूक असेल. ते इराणसाठी धक्कादायक असणार आहे. इराणला काय झाले ते समजणार नाही, ते फक्त विनाश पाहतील.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी