अल-अक्सा मशिदीत शिरुन इस्रायली मंत्र्याने हमासला संपविण्याची शपथ घेतली, व्हिडिओही बनवित व्हायरल केला, देखील संतापली
इस्रायल आणि हमासचा संघर्ष सुरु असतानाच इस्रायलचे संरक्षण मंत्री बेन ग्वीरने यांनी अल अक्सा मशिदीत शिरुन व्हिडीओ देखील बनविला आहे. बेन ग्विर यांनी नियम मोडल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर निषेधाचे सूर उमटले आहेत.

इस्रायलीची राजधानी जेरुसेलममधील वादग्रस्त अल-अक्सा मशिदीत इस्रालयचे संरक्षण मंत्री आपल्या सैन्यासह शिरल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी जेरुसेलमच्या येथील मुस्लीम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र ठिकाण असलेल्या अल-अक्सा मशिद हजारो ज्यूंसोबत शिरुन प्रार्थना केल्याने इस्रायलला पाठिंबा देणारी अमेरिका, मुस्लीम देश आणि युरोपिय संघ, युनो सर्वच संतापले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इतमार बेन ग्विर यांनी मंगळवारी अचानक अल अक्सा मशिदीत संरक्षण फौजासह शिरुन तेथे प्रार्थना करुन त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल केला आहे. त्यामुळे सर्व मुस्लीम देशांत संताप व्यक्त होत आहे.
अल- अक्सा ही मस्जिद परिसर हा ज्यू आणि मुस्लीम यांच्या सर्वात वादग्रस्त प्रदेश आहे. येथे ज्यूंना प्रार्थना करण्यास मनाई आहे. येथील मालकीवरुन गेली अनेक दशके वाद सुरु आहेत. इस्रायल आणि हमास यांच्या संघर्ष सुरु असतानाच इस्रायलचे संरक्षण मंत्री अल अक्सा मस्जिद परिसरात मंगळवारी आपल्या सुरक्षा रक्षकांसह थेट मस्जिदमध्ये शिरले तेथे त्यांनी प्रार्थना करीत हमास संपविण्याची शपथ घेतली.त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या घटनेचे पडसाद उमटले आहेत.
नियमांचे उल्लंघन झाले
आपल्या हजारो ज्यूं पाठीराख्यांसह इस्रालयचे संरक्षण मंत्री इतमार बेन ग्विर मशिदीच्या संकुलात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी तेथे प्रार्थनाही केली. यावेळी याचा व्हिडिओही देखील तयार करण्यात आला. यानंतर मुस्लिम देशांसह अमेरिका, युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.इस्रायल संरक्षण मंत्र्याने बेन ग्विरने अल-अक्सामध्ये जाऊन नियमांचे उल्लंघन केल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अशा घटना पुनरावृत्ती टाळावी अशी विनंती देखील केली आहे.
काय आहे अल अक्सा मस्जिद
अल अक्सा ही मस्जिद इस्लाम धर्मियांचा तिसरे पवित्र स्थळ आहे. तसेच पॅलेस्टाईन राष्ट्राचे आणि संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. इस्रायलने येथील जेरुसेलमला आपली राजधानी घोषीत केल्यानंतर या मशिदीच्या ताब्यावरुन ज्यू राष्ट्र इस्रायल आणि पॅलेस्टाईन मुस्लीम यांच्यात वाद सुरु आहेत.
