बेंजामिन नेतान्याहू यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारले, थेट जगाला सांगितले सत्य, नक्की…

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात ठार झाले असे सांगितले जात होते. त्यानंतर नेतान्याहू यांनी मी जिवंत आहे, सांगत एक व्हिडीओ तयार केला. यादरम्यानच नेतान्याहू यांनी अनेक विषयांवर थेट भाष्य केले.

बेंजामिन नेतान्याहू यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारले, थेट जगाला सांगितले सत्य, नक्की...
Benjamin Netanyahu and Donald Trump
| Updated on: Mar 20, 2026 | 8:50 AM

इराण आणि अमेरिका युद्ध 28 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झाले. आज युद्धाला 20 दिवस पूर्ण झाले. या युद्धात फक्त इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांचेच नुकसान झाले नसून जगातील अनेक देशांचे नुकसान होत असून थेट जगावर संकट आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती अस्थिर झाल्या. शिवाय सतत तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. तेलाची आयात आणि निर्यात थांबली आहे. तेल रिफायनरीवर मोठे हल्ले केले जात आहेत. गॅस प्रकल्पांवर हल्ले होत आहेत. जगात हाहाकार या युद्धामुळे सुरू आहे. यादरम्यानच आता इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेने या युद्धाबद्दल केलेले दावा फेटाळला आहे. इस्त्रायलने या युद्धात अमेरिकेला ओढल्याचे दावे सातत्याने केले जात आहेत, त्यावर अखेर इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी थेट भाष्य केले. अनेक प्रश्नांवर त्यांनी थेटपणे उत्तर दिली आहेत. गेल्या काही दिवसांपासून नेतान्याहू यांच्या निधनाच्या बातम्या येत होत्या.

20 दिवसांच्या युद्धानंतर इराणची ताकद कमी झाल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले. त्यांनी म्हटले की, इराणकडे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे बनवण्याची किंवा त्याचे युरेनियमचे संवर्धन करण्याची आता क्षमताच राहिली नाही. इराणची सर्व ताकद कमी झाली आहे. नेतन्याहू यांनी स्पष्टपणे बोलताना म्हटले की, हे अगदी चुकीचे आहे की, इस्त्रायलने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या युद्धात ओढले.

तुम्हाला खरोखरच वाटते की, डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणी सांगू शकतो की, त्यांनी काय करायला हवे? यासोबतच नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले रोखण्यास सांगितले, हे काही दिवसांसाठी हे हल्ले रोखावीत, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

सोबतच नेतान्याहू यांनी मान्य केले की, त्यांनी एकट्यांनी मिळून साऊथ पार्स गॅस प्रकल्पावर हल्ला केला, त्या हल्ल्यात इतर कोणत्याही देशाची भूमिका नव्हती. हेच नाही तर नेतन्याहू यांनी विश्वास दर्शवला की, हे युद्ध लवकरच संपेल. होर्मुज खाडीबद्दल बोलताना नेतन्याहू यांनी म्हटले की, इराण जगाला अशाप्रकारे ब्लॅमेल करू शकत नाही. मोठा दावा करत नेतन्याहू यांनी म्हटले की, सध्याच्या घडीला इराण खूप जास्त कमजोर झाला आहे.

Follow Us