AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेची मोठी हार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट रडण्याची वेळ, तब्बल 16..

अमेरिका आणि इराण युद्धात अमेरिका एकटी पडली आहे. एकही देश अमेरिकेच्या मदतीकरिता पुढे येत नाही. शिवाय अमेरिकेचे मोठे नुकसान युद्धात आतापर्यंतच्या 20 दिवसात झाले. इराणवर हल्ला करून मोठे संकट अमेरिकेने ओढवल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेची मोठी हार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट रडण्याची वेळ, तब्बल 16..
Donald Trump
| Updated on: Mar 20, 2026 | 8:14 AM
Share

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला मोठा धक्का बसला. अमेरिकेने विचारही केला नसेल आपल्याला इराणसोबतच्या युद्धात इतके मोठे नुकसान होईल. मुळात म्हणजे अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध फार जास्त हलक्यात घेतले. आता इराणकडून अमेरिकेला चारी बाजूने घेरण्यात आले. इस्त्रायलकडून इराणच्या गॅस प्रकल्पांना टार्गेट करून हल्ला करण्यात आला. त्यानंतर इराण ज्या पद्धतीने पेटून उठला, ज्याचा कोणी साधा विचारही केला नव्हता. इराण जखमी शेर सारखा पेटून उठला आहे. इस्त्रायलकडून इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांना ठार करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामध्येच अमेरिका संकटात सापडली आहे. मोठा पराभव या युद्धात अमेरिकेचा झाला. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने मोठा दबाव अमेरिकेवर आहे, शिवाय एकही देश मदतीकरिता पुढे येत नाही. डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिका आयुष्यभर लक्षात ठेवेल असे युद्ध सध्याच्या घडीला सुरू आहे.

अमेरिकेची 16 लष्करी विमाने नष्ट झाली आहेत. यामध्ये ड्रोन आणि लढाऊ विमानांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे या यादीत आता थेट अमेरिकेचे लढाऊ विमान एफ-35 चाही समावेश झाला. हा धक्का अमेरिकेसाठी आहे. कारण हे विमान रडारवरही दिसत नाही. अशा विमानावर इराणकडून हल्ला करण्यात आला. या युद्धात अमेरिकेची कमीत कमी 16 लष्करी विमाने नष्ट करण्यात आली.

इराणी हल्ल्यात 10 MQ-9 रीपर ड्रो देखील पाठण्यात आली. कुवेतमध्ये चुकून तीन F-15 लढाऊ विमाने पाडण्यात आली. हवेतच इतर विमानात इंधन भरणारे केसी-135 विमानही अमेरिकेचे नष्ट करण्यात आले. ज्यामध्येच 6 अमेरिकन सैनिक ठार झाले. इराणी बाजूचा दावा आहे की, ही अमेरिकन लढाऊ विमाने त्यांच्या हल्ल्यात नष्ट झाली आहेत.

यासोबतच अजूनही होर्मुज मार्ग सुरक्षित करण्यात अमेरिकेला यश मिळाले नाही. शिवाय एक पाऊल मागे घेत इराणच्या जवळ नेलेल्या आपल्या दोन युद्धनाैका अमेरिकेने मागे हटवल्या आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध तेलावर पोहोचले असून तेलाच्या प्रकल्पांवर हल्ले केले जात आहेत. हे हल्ले लवकर थांबवावीत नाही तर जग वेगळ्या संकटात सापडण्याची भीती इतर देशांना वाटत आहे. या युद्धात सर्वाधिक टीका अमेरिकेवरच केली जात आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!