AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणला घाबरून कॅटरिंगच्या ट्रकमध्ये लपून ट्रम्प यांचा प्रवास, रिपोर्टने खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात मोठे युद्ध पुकारले. मात्र, या युद्धाचा फटका जगातील सर्व देशांना बसला. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढताना दिसत आहेत. त्यामध्येच आता मोठा खुलासा करण्यात आलाय.

इराणला घाबरून कॅटरिंगच्या ट्रकमध्ये लपून ट्रम्प यांचा प्रवास, रिपोर्टने खळबळ
Donald Trump
| Edited By: | Updated on: Aug 11, 2026 | 6:37 PM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत एक अत्यंत मोठा खुलासा पुढे आला. याबाबत व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ कर्मचाऱ्यांनाही माहिती नव्हती. रिपोर्टनुसार, जुलै महिन्यात डोनाल्ड ट्रम्प तुर्कीला गेले होते. यावेळीच गुप्त सुरक्षा ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी इराणचा धोका लक्षात घेता ऐनवेळी कोणालाही खबर न लागू देता डोनाल्ड ट्रम्प यांना ठरवलेले विमान सोडून दुसऱ्या विमानात बसवण्यात आले आणि अगोदरच्याच विमानात डोनाल्ड ट्रम्प आहेत, असे भासवण्यात आले. हे ऑपरेशन त्यांनी इतके जास्त गुप्त ठेवले की, कोणालाही याबाबत माहिती कळू दिली नाही. मीडियापासूनही त्यांनी ही माहिती लपवली. डोनाल्ड ट्रम्प जुलै महिन्यात नाटो शिखर सम्मेलनात तु्र्कीच्या अंकारा येथे पोहोचले होते.

यावेळी कतरकडून मिळालेले बोइंग 748-8 विमान पण होते. ज्याला एअर फोर्सच्या वन वे प्रमाण तयार केले. पण तुर्कीहून ब्रिटेनला जाताना मोठा निर्णय घेण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांना जाणून बुजून एअर फोर्सच्या वन वे मध्ये चढताना दाखवण्यात आले. मात्र, यावेळी त्यांना एका कैटरिंग ट्रकच्या आडून दुसऱ्या विमानात पोहोचवण्यात आले.

सी-32 विमानाने त्यांना तुर्कीच्या बाहेर काढण्यात आले. मुद्द्यात संभ्रम निर्माण करण्यासाठी अगोदरचे विमानाचे उड्डाण करण्यात आले. दोन्ही विमानामध्ये थोडा अंतर होता. इराणकडून मोठा हल्ला होऊ शकतो, म्हणजे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी हा निर्णय घेतला. याबाबत फार कमी लोकांना माहिती होती. व्हाईट हाऊसने सुरक्षेच्या कारणाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

आता काही दिवसानंतर हा खुलासा करण्यात आला. इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वीच इस्त्रायलने केला. मात्र, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने स्पष्ट केले की, हा जुना कट आहे, यात नवीन काहीही नाही. इराणमधून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या धमक्या दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच एक मोठी रॅली निघाली, या रॅलीतील भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येबाबत भाष्य करण्यात आले.

Follow Us
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप