कमाल आहे, कडेकोट सुरक्षा असताना विमानतळावरून तब्बल 6,542 हत्यारे जप्त

विमान अपहरणांच्या घटनानंतर विमानतळावरील सुरक्षेत खूपच वाढ केली आहे. तरी काही देशात विमानतळावर हत्यारे सापडत आहेत.

कमाल आहे, कडेकोट सुरक्षा असताना विमानतळावरून तब्बल 6,542 हत्यारे जप्त
AIRPORT
Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 21, 2023 | 8:40 PM

वॉशिग्टन : विमानतळ म्हटले की आपल्याला तेथील कडेकोट सुरक्षा आणि कठोर तपासणी आठवत असते. परंतू काही देशातील विमानतळांवर सापडलेली शस्रास्रांची आकडेवारी पाहिली की शंका निर्माण होऊ  शकते. सर्वाधिक व्यक्ती स्वातंत्र्य असणाऱ्या अमेरिकेतील परिवहन सुरक्षा प्रशासनाने विमानतळांवरून गेल्यावर्षी तब्बल 6,542 आधुनिक शस्त्रास्रे जप्त केली आहेत. म्हणजे याची सरासरी काढली तर दिवसाला अठरा हत्यारे विमान प्रवाशांकडून जप्त करण्यात आली आहेत.

अमेरीकेच्या विमानतळावर सुरक्षा तपासणीत गेल्यावर्षी तब्बल 6,542 आधुनिक हत्यारे जप्त केली आहेत. अमेरिकन विमानतळावर गेल्यावर्षी पकडल्या गेलेल्या हत्यारांची ही सर्वाधिक संख्या आहे. यावरून स्पष्ट होत आहे अमेरिकेत स्वसुरक्षेसाठी पिस्तुले बाळगण्याचे प्रमाण किती वाढले आहे.

अमेरिकेच्या परिवहन सुरक्षा प्रशासन ( टीएसए ) प्रशासक डेविड पेकोसके यांनी सांगितले की आम्ही आमच्या तपास चौक्यात जे काही पाहत आहोत ती आमच्या समाजाची सत्य परिस्थिती आहे.अधिकाधिक लोक हत्यारे बाळगण्याच्या स्पर्धेत उडी घेत आहेत.

अमेरिकेत आपण दर काही वर्षांनी बंदुकीने पाच वर्षांच्या मुलाने आजीवर गोळीबार केला किंवा शाळेत पिस्तुलातून गोळ्या झाडत अनेकांचे बळी अशा बातम्या आपण सातत्याने वाचत असतो.

अमेरिकेतील विमान तळांवर जप्त झालेल्या हत्यारावरून आपल्या तेथील परिस्थितीचा अंदाज घेता येऊ शकतो. कोरोना साथीच्या टाळेबंदीमुळे 2020 चा काळ वगळता साल 2010 नंतर विमानतळांवर तपासणीत मिळणाऱ्या हत्यारांची संख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे. यातील अनेक विमान प्रवाशांनी आपण आपल्याकडे शस्त्र आहे हे विसरून गेलो होतो असे उत्तर तपास अधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र त्यांनी विमानात हत्यार चुकीच्या हातात जाण्याने किती धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते हे त्यांनी मान्य केले आहे.

या विमानतळांवर सर्वाधिक हत्यारे पकडली

बरबॅंक, कॅलिफोर्निया, बांगोर, मेन तक या विमानतळांवर ही हत्यारे जप्त केली आहेत. पेकोस्के यांनी सांगितले की हा प्रकार अशा विमानतळांवर जास्त होतो. जिथे कायदा पिस्तूल घेऊन जाण्यास अधिक अनुकूल आहे. साल 2022 मध्ये हत्यारे सर्वात जास्त मिळण्याच्या प्रमुख दहा ठिकाणामध्ये टेक्सासमधील डलास, ऑस्टीन आणि ह्युस्टन, फ्लोरीडामधील तीन विमानतळे आणि टेनेसीमधील नॅशविले, अटलांटा, फिनिक्स तसे डेनवर विमानतळे सामील आहे.