AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Japan: आधी परराष्ट्र मंत्री आता जपानचे नवे पंतप्रधान, जाणून घ्या कोण आहेत फुमियो किशिदा?

किशिदा जपानचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत आणि त्यांनी लिबरल डेमोक्रेटिक पार्टी (एलडीपी) चे प्रमुख, पंतप्रधान योशीहिदे सुगा यांची जागा घेतली आहे.

Japan: आधी परराष्ट्र मंत्री आता जपानचे नवे पंतप्रधान, जाणून घ्या कोण आहेत फुमियो किशिदा?
जापानचे मुत्सद्दी राजकारणी फुमियो किशिदा जापानचे नवे पंतप्रधान बनणार आहेत.
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 3:35 PM
Share

जपानचे मुत्सद्दी राजकारणी फुमियो किशिदा जापानचे नवे पंतप्रधान बनणार आहेत. किशिदा यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेतेपदाची निवडणूक जिंकली आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, किशिदा निवडणूक जिंकताच देशाच्या पुढील पंतप्रधान होण्यास तयार आहेत. ( japan former top diplomat fumio kishida to become next prime minister of japan know all about him )

किशिदा जपानचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत आणि त्यांनी लिबरल डेमोक्रेटिक पार्टी (एलडीपी) चे प्रमुख, पंतप्रधान योशीहिदे सुगा यांची जागा घेतली आहे. सुगा एका वर्षानंतर पद सोडणार आहे. एक वर्षापूर्वी, तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी आजारपणामुळे पायउतार होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सुगा यांना पंतप्रधान बनवण्यात आले.

पुढच्या महिन्यात पंतप्रधानपदी नियु्क्ती

लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला किशिदाच्या रूपाने नवीन नेता मिळाला आहे. आता हे ठरवण्यात आले आहे की, सोमवारी जेव्हा संसद पंतप्रधानांच्या नावावर निर्णय घेईल, तेव्हा किशिदा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. किशिदांचा पक्ष संसदेत बहुमतात आहे आणि आघाडीचा पक्ष म्हणून सरकारचा भाग आहे.

किशिदा यांनी देशाचे व्हॅक्सिनेशन मंत्री असलेल्या तारो कोनो यांचा पराभव केला आहे. कानो व्यतिरिक्त, या शर्यतीत साने ताकीची आणि सेको नोडा या दोन महिला उमेदवारही होत्या. पण दोघेही पहिल्या फेरीनंतर बाहेर पडल्या. पक्ष नेतृत्वाची निवडणूक जिंकल्यानंतर आता ते पुढील महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारतील.

2012 ते 2017 पर्यंत परराष्ट्र मंत्री

किशिदा 2012 ते 2017 पर्यंत जपानच्या परराष्ट्र मंत्री होते. ते जपानच्या प्रतिनिधी सभागृहाचे सदस्य आहेत आणि एलडीपीच्या धोरण संशोधन परिषदेचे अध्यक्षही राहिले आहेत. किशिदा यांना राजकारणाचा वारसा मिळाला आहे. त्यांचा जन्म 29 जुलै 1957 रोजी हिरोशिमा इथल्या मिनामी कु या प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात झाला. त्याचे वडील आणि आजोबा दोघेही राजकारणी होते आणि जपान लोअर हाऊसचे सदस्य होते.

याशिवाय जपानचे माजी पंतप्रधान किशी मियाजावा हे त्यांचे नातेवाईक आहेत. किशिदाचे वडील न्यूयॉर्कमध्ये नोकरी करत होते आणि यामुळेच त्यांनी सुरुवातीचे शिक्षण न्यूयॉर्कमध्ये केले. 1982 मध्ये त्यांनी वासेदा विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.

1993 मध्ये खासदारकीची निवडणूक जिंकली

किशिदा यांनी क्रेडिट बँक ऑफ जपानमध्ये बराच काळ काम केले. यानंतर त्यांची सभागृहात सचिव म्हणून नियुक्ती झाली. 1993 मध्ये ते प्रतिनिधी सभागृहात निवडून आले आणि ते हिरोशिमामधून खासदार म्हणून तिथं पोहोचले. 2007 ते 2008 पर्यंत ते ओकिनावा अफेअर्स मंत्री म्हणून राहिले आणि नंतर त्यांना फकुडाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. 2008 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जोशुआ फाकुडा यांनी त्यांना ग्राहक आणि अन्न सुरक्षा राज्यमंत्री बनवलं.

पत्नीच्या फोटोनंतर वादात

काही दिवसांपूर्वी 63 वर्षीय किशिदा वादात सापडले, जेव्हा त्यांनी आपल्या पत्नीचा एप्रन घातलेला फोटो शेअर केला. या फोटोत किशिदा यांची पत्नी डेनिम ब्लू कलर एप्रनमध्ये होती, आणि ती किशिदा यांना जेवण देत होती. हा फोटो व्हायरल झाला आणि पत्नीला किशिदा मोलकरणीसारखी वागणूक देत असल्याची टीका सुरु झाली.

हेही वाचा:

Afghanistan: सैन्य परत बोलावणं ही अमेरिकेचं सर्वात मोठं अपयश, US आर्मीच्या टॉप कमांडरकडून बायडन यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्हं

Pakistan Blasphemy Case: पाकिस्तानात शाळेची मुख्याध्यापिका ईशनिंदा कायद्याची शिकार, कोर्टाकडून फाशीची शिक्षा

 

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.