AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकताच बायडन यांचं पहिलं ट्विट, म्हणतात…

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दणदणीत पराभव केला आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकताच बायडन यांचं पहिलं ट्विट, म्हणतात...
एकूणच व्हाईट हाऊसची फाईट रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. येत्या काही तासांत अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार, हे स्पष्ट होईल.
| Updated on: Nov 08, 2020 | 12:42 AM
Share

वॉश्गिंटन : अमेरिकेचे (US Election) 46 वा राष्ट्राध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आता सगळ्या जगाला मिळालं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन  (Joe Biden) यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांचा दणदणीत पराभव केला आहे. अमेरिकेची जनता आपल्यालाच राष्ट्राध्यक्षपदाची संधी देईल, असा विश्वास बायडन यांनी दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केला होता. अखेर आज बायडन ‘महासत्तेचे महासत्ताधीश’ म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकताच त्यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Joe Biden First tweet After Win US Election)

गेल्या दोन दिवसांपासून मतमोजणी सुरु होती. अखेर भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 10 च्या सुमारास जो बायडन विजयी झाल्याचं अमेरिकन वृत्तसंस्थांनी जाहीर केलं. जो बायडन या निवडणुकीत 273 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांना अवघे 214 मते मिळाली आहेत. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.  त्यानंतर ट्विट करुन जो बायडन यांनी अमेरिकन जनतेचे आभार मानले आहेत.

“अमेरिकेसारख्या महासत्ताधिश देशाचं नेतृत्व करण्याची अमेरिकेच्या जनतेने मला संधी दिली. अमेरिकन जनतेने केलेला हा माझा सन्मान आहे. जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. तुम्ही मला मतदान केलं असेल किंवा नाही पण तुमचा विश्वास सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करेन”, असं ट्विट करत निकालानंतर जो बायडन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

व्हाइट हाऊसमधील राजकारणाचा तब्बल 46 वर्षे अनुभव असलेले आणि दोनदा अमेरिकेचे उपराष्ट्रपती राहिलेले जो बायडन हे अनेक कारणांनी प्रसिद्धही आहेत आणि वादग्रस्तही ठरलेले आहेत. जो बायडन अर्थात जोसेफ रॉबिनेट बायडेन ज्युनिअर यांचा जन्म 1942मध्ये पेन्सिलवेनियाच्या स्क्रँटन येथे झाला. लहानपणीच त्यांचे कुटुंबीय डेलवेअरला राह्यला आले होते. त्यांना कौटुंबिक जीवनात अनेक चढ-उतार पाहावे लागले.

बायडन पहिली पत्नी निलीया आणि मुलगी नाओमी यांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर वयाच्या 46व्या वर्षी मुलगा ब्यू याचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. मात्र, कौटुंबिक संकट आल्यानंतरही अमेरिकन राजकारणात ठामपणे उभा राहिलेला हा योद्धा तसूभरही डगमगला नाही.

सर्वात तरूण सिनेटर

जो बायडन हे डेलवेअरमधून 6 वेळा सिनेटर म्हणून निवडून आले आहेत. 1972मध्ये निवडून आलेले ते सर्वात तरूण सिनेटर होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची त्यांची ही तिसरी निवडणूक आहे. 1988मध्ये त्यांनी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभं राहण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वाङमय चोरीच्या आरोपमुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. दुसऱ्यांदा त्यांनी 2008मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रयत्न केला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून जो बायडन यांना ओळखलं जातं. ओबामांच्या कार्यकाळात ते 2008 आणि 2016मध्ये दोनदा उपराष्ट्रपती होते. म्हणूनच यंदाच्या निवडणुकीत जो बायडन विजयी व्हावेत म्हणून स्वत: बराक ओबामा यांनी बराच प्रयत्न केला.

वादग्रस्त बायडन

जो बायडन अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्यावर वाङमय चौर्याचाही आरोप झाला होता आणि तो त्यांनी मान्यही केला होता. लॉ स्कूलमध्ये पहिल्याच वर्षी कायद्याच्या समीक्षेचा लेख चोरल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. ब्रिटीश लेबर पार्टीचे नेते नील किन्नॉक यांच्या भाषणाचीही त्यांनी चोरी केली होती. तसेच सीनेट कार्यालयात काम करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग केल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

(Joe Biden First tweet After Win US Election)

संबंधित बातम्या

जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प यांचा पराभव

Kamala Harris | भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांचा ऐतिहासिक विजय, अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष

Joe Biden | ‘जो’ जीता वही सिकंदर!; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.