
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील हे सांगणे फार जास्त कठीण आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ आकारत असल्याचे अमेरिकेने सांगितले. यासोबतच भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता विविध प्रकारे भारतावर दबाव टाकला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प घेत असलेल्या निर्णयाचा फटका एकटा भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला बसताना दिसतोय. अमेरिकेच्या विरोधात काही देश थेट भूमिका घेत असून अमेरिकेच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. नुकताच रशियाने अमेरिकेच्या दबावापुढे बळी न पडता थेट मोठी धमकीच देऊन टाकली, ज्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प घेत असलेल्या निर्णयाला अमेरिकेतूनही जोरदार विरोध होत आहे. लोक डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका करताना कमला हॅरिश दिसल्या आहेत. यासोबतच त्यांनी थेट पागलपणाची हद्द असल्याचे देखील म्हटले. अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प सरकारवर जोरदार टीका केली.
लॉस एंजिल्स गॅटी सेंटरमधील ए डे ऑफ अनरीजनेबल कन्वर्सेशन नावाच्या शिखर परिषदेमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. कमला हॅरिश यांनी म्हटले की, आम्ही सर्वजण इतिहास रचत आहोत. तुम्ही फक्त साक्षीदार नाहीत, हे देखील तुम्हाला माहिती आहे. सध्या असे काही होत आहे की, सर्वांना विचार करण्याची गरज आहे. काहीतरी वेगळे दाखवण्याचे प्रयत्न केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात फक्त पागलपण सुरू आहे.
यावेळी काही अपशब्दांचा देखील वापर कमला हॅरिश यांनी केला. यावेळी उपस्थित लोकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट टीका करताना कमला हॅरिश दिसल्या. यावेळी त्या भावूक होताना देखील दिसल्या. यापूर्वीही त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. त्यामध्येच त्यांनी आता डोनाल्ड ट्रम्प यांचे कारनामे म्हणजे पागलपण असल्याचे म्हटले आहे.