डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत मोठी घोषणा! हमास आणि इस्रायल युद्धाबाबत मोठे अपडेट, दोन्ही देश…
डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल आणि हमास युद्धाबाबत 20 कलमी प्रस्ताव ठेवला होता. हमासकडून हा प्रस्ताव मान्य केला जात नव्हता. शेवटी आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना मोठे यश आल्याचे बघायला मिळतंय. हमासने या प्रस्तावाला होकार दिलाय.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच अत्यंत मोठी घोषणा केली. अमेरिकेने ठेवलेल्या 20 कलमी प्रस्तावासाठी इस्रायल आणि हमास दोन्ही देश सहमत झाल्याचे त्यांनी म्हटले. अनेक दिवसांनी गाझा पट्टीमध्ये शांतता बघायला मिळेल. संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे होते. हे युद्ध अधिक पेटत असतानाच अमेरिकेने यामध्ये मध्यस्थी केली आणि अखेर त्यांना हे युद्ध रोखण्यास यश मिळाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही मुस्लिम देशांना एकत्र घेऊन हा 20 कलमी प्रस्ताव तयार केला. इस्त्रायलने प्रस्तावाला लगेचच मंजूरी दिली. मात्र, म्हणावा तसा सकारात्मक प्रतिसाद हमासकडून मिळत नव्हता. हमासला 72 तासांचा वेळ डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला, तरीही हमासकडून उत्तर मिळत नसल्याने इस्त्रायलला हमासवर हल्ला करण्याची पूर्ण सूट देत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. शेवटी आता हमासने देखील हा प्रस्ताव मंजूर केला.
या युद्धबंदीमधील सर्वात महत्वाची बाब म्हणजे युद्धबंदीसोबतच कैद्यांची सुटका देखील केली जाईल. गुरुवारी इजिप्तमध्ये स्वाक्षरी झालेल्या या कराराला हमास सहमत झाला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथआउटवर एक पोस्ट शेअर केली, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, मला हे जाहीर करताना खूप जास्त अभिमान वाटतो की, इस्रायल आणि हमास दोघेही आमच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमत झाले आहेत.
सर्व ओलिसांना लवकरच सोडण्यात येईल आणि इस्रायली सैन्य काही प्रमाणात माघार घेईल. हे कायमस्वरूपी शांततेच्या दिशेने पहिले मोठे पाऊल असणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हा प्रस्ताव मान्य करण्यासाठी मोठा दबाव हमासवर टाकला जात होता. मात्र, हमासला काही अटी मान्य नसल्याने ते प्रस्ताव मान्य करत नव्हते. शेवटी हमासने देखील या प्रस्ताव मान्य केला आहे.
टिकावू आणि मजबूत सुरक्षेसाठी हे मोठे पाऊल असणार आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायल आणि हमास युद्धबंदीच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला सुरूवातीलाच पाठिंबा दिला होता. यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रम्प यांचे काैतुकही या प्रस्तावासाठी केले होते. अमेरिकेने मांडलेल्या प्रस्तावाचे स्वागत जगातील अनेक देशांनी केले होते.
