AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मीरलाच आता पाकिस्तानात यायचे नाही, आपल्याच नेत्यांवर भडकले पाकिस्तानी लोकं

India pakistan : पाकिस्तानने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर भारतीय अधिकाऱ्यांने त्यांना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. पण यासोबतच पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्किस्तानला खडेबोल सुनावले आहे. यानंतर पाकिस्तानी लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या. काश्मीरबाबत आता ते काय म्हणताय पाहा.

काश्मीरलाच आता पाकिस्तानात यायचे नाही, आपल्याच नेत्यांवर भडकले पाकिस्तानी लोकं
| Updated on: Mar 01, 2024 | 5:02 PM
Share

इस्लामाबाद : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याने भारताने गुरुवारी तुर्कस्तान आणि पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला होता. भारताने तुर्कस्तानला आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला होता. तर पाकिस्तानला आधी दहशतवादावर बोलण्याचा सल्ला दिला. जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे भारताने पुन्हा एकदा जगाला सांगितले. याबाबत पाकिस्तानी जनतेला काय वाटते यावर एका युट्युबरने पाकिस्तानी लोकांची प्रतिक्रिया घेतली आहे.

भारतासोबत व्यापार व्हावा का?

पाकिस्तानी यूट्यूबर सना अमजदने लोकांसोबत चर्चा केली. इम्रान खान यांनी भारतासोबत व्यापार बंद केल्याचे त्याच्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिली. भारताव्यतिरिक्त पाकिस्तानला लागून असलेल्या अफगाणिस्तान आणि इराणशी देखील वाद आहेत. भारतासोबत व्यापार झाला पाहिजे असे काही लोकांनी म्हटले आहे. काही लोकं म्हणाले की, आपलेच खायचे वांदे आहेत आणि आपण काश्मीरला पाकिस्तानात यायला सांगतोय. ते येथे का येतील. जेथे ३० रुपये किलो पीठ मिळतं. तेच आपल्याकडे महाग आहे.

काश्मीरला पाकिस्तानात यायचे नाही

आणखी एका व्यक्तीने संभाषणात सांगितले की, पाकिस्तानचे लोक आता मुक्त आहेत का? हाच प्रश्न आहे. पाकिस्तानची परिस्थिती पॅलेस्टाईनसारखी झाली आहे, तिथे लोक मारले जात आहेत. आणखी एका व्यक्तीने सांगितले की, काश्मिरींना आपल्याकडे यायचे आहे का हाच प्रश्न आहे. काश्मीरला पाकिस्तान सोबत यायचे नाहीये. तो पाकिस्तानात येऊन महागडे पीठ खरेदी करेल. आम्हाला फक्त मतदानाचा अधिकार होता. तीही चोरीला गेला आहे.

बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग नाही का?

पुढे एका व्यक्तीने म्हटले की, भारतासोबत व्यापार व्हायला हवा, तरच पाकिस्तानची महागाई कमी होईल. बलुचिस्तानमधील एका व्यक्तीने संभाषणात सांगितले की, काश्मीरबद्दल बोलणे सोपे आहे. पण बलुचिस्तानमध्ये रोज बॉम्बस्फोट होत आहेत. रोज माणसे मारली जात आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे सरकारला शक्य नाही. या व्यक्तीने पुढे विचारले की, जे काम लाहोरमध्ये होते ते बलुचिस्तानमध्ये होत नाही. तो पाकिस्तानचा भाग नाही का?

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.