AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हुकूमशाह किम जोंगच्या उत्तर कोरियाची जगाला धडकी भरवणारी कृती, अमेरिका, जपान, दक्षिण कोरियामध्ये खळबळ

North Korea Kim Jong Un : उत्तर कोरियाने एक असं पाऊल उचललय. त्यामुळे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांमध्ये एकाचवेळी खळबळ उडाली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग नेहमीच धमक्या देत असतो.

हुकूमशाह किम जोंगच्या उत्तर कोरियाची जगाला धडकी भरवणारी कृती, अमेरिका, जपान, दक्षिण कोरियामध्ये खळबळ
North Korea Kim Jong Un
| Updated on: Sep 20, 2026 | 4:39 PM
Share

उत्तर कोरियाने पुन्हा एकदा जगात अस्वस्थता, अस्थिरता निर्माण होईल अशी कृती केली आहे. अणवस्त्र संपन्न असलेला उत्तर कोरिया सतत जगाला धमक्या देत असतो.उत्तर कोरियापासून सर्वाधिक धोका दक्षिण कोरियाला आहे. अमेरिकाविरोधी असलेल्या उत्तर कोरियाला रशिया, चीन या देशांचं पाठबळ आहे. उत्तर कोरियाने रविवारी कोरियाई बेटाच्या पूर्वेकडच्या समुद्रात एक बॅलेस्टिक मिसाइल डागलं. जपानच्या संरक्षण मंत्रालयाने याची माहिती दिली. उत्तर कोरियाने प्रोजेक्टाइल डागल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

जपानच्या स्पेशल इकोनॉमिक झोनच्या बाहेर जाऊन हे मिसाइल पडल्याची माहिती जपानच्या सरकारी मीडियाने दिली. मागच्या आठवड्यात उत्तर कोरियाने अमेरिकेच्या नेतृत्वाखाली झालेल्या नौदल युद्ध सरावाची निंदा केली होती. या युद्धसरावात दक्षिण कोरिया आणि जपान सहभागी झाले होते. 29 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत गुआम जवळ हा युद्ध सराव सुरु होता.

अणवस्त्र धोरणाबद्दल काय म्हटलं?

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनची बहिण किम यो जोंगने शुक्रवारी कोरियाई उपखंडातील वाढत्या तणावासाठी अमेरिकेला जबाबदार धरलं होतं. आम्ही आमची अणवस्त्र मजबूत करण्याच्या धोरणामध्ये कुठलाही बदल करणार नाही असं किम यो जोंग म्हणाले.

दक्षिण कोरियाने बोलावली तातडीची बैठक

उत्तर कोरियाच्या मिसाइल लॉन्चनंतर दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने रविवारी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली होती. रिपोर्ट्नुसार, उत्तर कोरियाने वॉनसान भागाच्या पूर्वेकडच्या समुद्रात कमी पल्ल्याच बॅलेस्टिक मिसाइल डागलं.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावचं थेट उल्लंघन

दक्षिण कोरियाने या मिसाइल लॉन्चची निंदा केली आहे. एक आठवड्याच्या आत उत्तर कोरियाचं हे दुसरं मिसाइल परीक्षण आहे. याआधी 12 सप्टेंबरला परीक्षण केलं होतं. दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाला तात्काळ मिसाइल चाचण्या थांबवण्याचं आवाहन केलं आहे. उत्तर कोरियाची ही चाचणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावचं थेट उल्लंघन आहे.

Follow Us
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश