तालिबानकडून अफगाणिस्तानवर सत्ता आणि महिला रिपोर्टरचा ड्रेस बदलला, काय आहे खरं? वाचा…

| Updated on: Sep 02, 2021 | 7:17 AM

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबिज केल्यानंतर महिलांच्या स्थितीबद्दल जगभरात काळजी व्यक्त केली जातेय. महिलांना आपले मुलभूत अधिकारही हिरावले जाण्याची भिती आहे. याच दरम्यान एका अमेरकन महिला पत्रकाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

1 / 6

2 / 6
सीएनएन वृत्तवाहिनीची पत्रकार क्लेरिसा वॉर्डचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यात ती वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. यातील काही फोटोत ती पाश्चिमात्य ड्रेसमध्ये तर काही फोटोंमध्ये बुरखा (हिजाब) घातलेल्या वेशात आहे. त्यामुळे तालिबानने अफगाणिस्तावर कब्जा केल्यानंतरच पोशाखात बदल झाल्याचं बोललं जातंय.

3 / 6
हिजाब सामान्यपणे मुस्लीम धर्मातील शिया महिला घालतात. तालिबानमुळे वॉर्ड यांना आपला पोशाख बदलून हिजाब घालायला लागल्याचा आरोप लोक करत आहेत.

4 / 6
दुसरीकडे क्लेरिसा वॉर्डने एक ट्वीट करत यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी सांगितलं की पाश्चिमात्य वेशातील फोटो खासगी ठिकाणावरील आहे, तर हिजाबमधील फोटो तालिबानच्या नियंत्रणातील काबुलमधील आहेत. मी जेव्हा काबुलमध्ये रिपोर्टिंगसाठी जाते तेव्हा डोक्यावर ओढणी घेते. माझं डोकं पूर्णपणे झाकलेलं नसतं. थोडे बदल झालेत मात्र सोशल मीडियावर फोटोसोबत जे दावे केले जात आहेत तसे नक्कीच नाहीत.

5 / 6
क्लेरिसा वॉर्ड यांची ओळख एक निर्भिड पत्रकार म्हणून आहे. त्यांनी मुस्लीम कट्टरवादाचा परिणा झालेल्या अनेक देशाचे दौरे केलेत. 2012 मध्ये सीरियातील गृह युद्धातही त्यांनी रिपोर्टिंग केलं. त्यांनी मिस्रमध्ये देखील रिपोर्टिंग केलं.

6 / 6
क्लेरिसा वॉर्डने 2019 मध्ये तालिबानचं नियंत्रण असलेल्या भागातील लोकांचं जगणं दाखवलं होतं. असं रिपोर्टिंग करणाऱ्या त्या पहिल्या पाश्चिमात्य पत्रकार होत्या. त्यांनी अनेक तालिबानी नेत्यांच्याही मुलाखती घेतल्या.