AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकरात लवकर गाझा सोडण्याच्या नागरिकांना सूचना, इस्रायलकडून मोठ्या हल्ल्याची तयारी?

Israel - Hamas War : इस्रायलकडून हमासवर हल्ले आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. गाझा पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी इस्रायलच्या सैन्याकडून तयारी पूर्ण झाल्याचं बोललं जात आहे. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहत असल्याचं इस्रायलच्या लष्कराने म्हटलं आहे.

लवकरात लवकर गाझा सोडण्याच्या नागरिकांना सूचना, इस्रायलकडून मोठ्या हल्ल्याची तयारी?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 13, 2023 | 3:38 PM
Share

जेरुसलेम : इस्रायली सैन्याने शुक्रवारी गाझा शहरात राहणाऱ्या हजारो लोकांना तेथून निघून जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. इस्रायलने या भागात कारवाईची तयारी केली आहे. इस्रायलने तीन लाख सैन्य तयार ठेवलं आहे. संयुक्त राष्ट्राने सांगितले की, उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या 11 लाख लोकांना 24 तासांच्या आत इस्रायलकडून बाहेर काढण्याचा इशारा मिळाला आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने शनिवारी इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. यानंतर इस्रायलकडून युद्धाची घोषणा करण्यात आली होती. इस्रायलच्या संरक्षण दलाने हमासच्या मुख्य ठिकाणांना लक्ष्य केले होते.

इस्रायलकडून लोकांना सूचना

इस्रायल-हमास यांच्यातील संघर्षाचा आज सातवा दिवस आहे. इस्रायलचं लष्कर आता मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. गाझा शहरातील नागरिकांना दक्षिणेकडे जाण्यास सांगण्यात आले आहे. हमासचे दहशतवादी गाझा शहरात बंकरमध्ये लपून बसले आहेत. गाझा शहरातील यूएन पॅलेस्टिनी निर्वासित एजन्सीचे अधिकारी इनास हमदान म्हणाले, ‘संपूर्ण अराजकतेचे वातावरण आहे, काय करावे हे कोणालाच कळत नाही. गाझा शहर आणि उत्तर गाझामधील यूएनच्या सर्व कर्मचाऱ्यांना येथून बाहेर काढण्यात आले आहे.

जमीन हल्ले तीव्र करण्याआधी इस्रायलनकडून इशारा

इस्रायली सैन्याने गाझा शहरातील नागरिकांना सांगितले आहेत की, हे स्थलांतरण तुमच्या सुरक्षेसाठी आहे. याचा अर्थ इस्रायल मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. इस्रायली सैन्याकडून मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लष्कराने सांगितले की ते हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. मात्र याबाबत सध्या कोणताही निर्णय झालेला नाही. संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले की, इस्रायलने गाझाच्या लोकांना २४ तासांत दक्षिणेकडे जाण्यास सांगितले आहे.

इस्रायलने हमासच्या १५०० सैनिकांना केले ठार

इस्रायलने दावा केला आहे की, त्याच्या हद्दीत सुमारे 1,500 हमासचे अतिरेकी मारले गेले आहेत. इस्रायलचे ऊर्जा मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले की ट्रक गाझामध्ये प्रवेश करणार नाही.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?