
लाहोर : गेल्या अनेक वर्षांपासून भारतात वारंवार दहशतवादी हल्ले करणाऱ्या एका मोठ्या अतिरेक्याचा पाकिस्तानात गेम झाला आहे. लष्कर-ए-तयबाचा हा टॉप कमांडर होता. काश्मीर खोऱ्यात सुरक्षा पथकांवर हल्ले घडवून आणण्यात त्याचा हात होता. अदनान अहमद ऊर्फ अबू हंझाला असं या दहशतवाद्याच नाव आहे. तीन दिवसांपूर्वी कराचीत कुणी अनोळखी व्यक्तींनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली. महत्त्वाच म्हणजे त्याला ISI ने सुरक्षा प्रदान केली होती. ISI च दोन स्तरीय सुरक्षा कवच भेदून हल्लेखोरांनी त्याला संपवलं. त्याच्या डोक्यात, छातीत आणि पोटात गोळ्या झाडल्या. हंझालाच्या मृतदेहाचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज लष्कर समर्थक टेलिग्राम अकाऊंटवरुन जारी करण्यात आलं. त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह व्हॅनमध्ये दिसतोय. रात्रीच्यावेळी घराबाहेर हल्लेखोरांनी त्याला टार्गेट केलं. अब्बासी शाहीद हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हा दहशतवादी हल्ला असल्याच पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी म्हटलं आहे.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये यावर्षी असे दहशतवाद्यांचे अनेक रहस्यमयी मृत्यू झाले आहेत. 25 जून 2016 रोजी काश्मीर पमपोरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला झाला होता. अदनान अहमद ऊर्फ अबू हंझालाने या हल्ल्यात समन्यवकाची भूमिका बजावली होती. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. 22 जवान जखमी झाले होते. भारताच्या मोस्ट वाँटेड यादीतील आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. पाकिस्तानने अदनान अहमदला सुरक्षा प्रदान केली होती. 24 तास सुरक्षा रक्षकांच्या घेऱ्यामध्ये तो असायचा. लष्कर ए तयबाच्या दोन दहशतवाद्यांची महिन्याभरापूर्वी अशीच रहस्यमयरित्या हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता अबू हंझालाला संपवण्यात आलं.
POK मध्ये त्याचा धडावेगळा अवस्थेतील मृतदेह
लष्करचा कमांडर अक्रम गाझीला खैबर पख्तूनख्वा आणि ख्वाजा शाहीदची सुद्धा अशीच रहस्यमयरित्या हत्या करण्यात आली होती. ख्वाजा शाहीद 2018 साली झालेल्या संजवान दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. अपहरण करुन त्याचा शिरच्छेद करण्यात आला. POK मध्ये त्याचा धडावेगळा अवस्थेतील मृतदेह सापडला होता. 2015 साली उधमपूरमध्ये बीएसएपच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. अबू हंझाला या हल्ल्यामागचा मास्टर माइंड होता. हंझाला लष्करचा कम्युनिकेशन एक्सपर्ट होता. हंझाला लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांच्या ट्रेनिंगवर लक्ष ठेवायचा. कम्युनिकेशन App कसे वापरायचे या विषयी मार्गदर्शन करायचा. काश्मीर खोऱ्याती दहशतवाद्यांना मदत पुरावयाचा. भारतविरोधी कारवाया करणाऱ्या या दहशतवाद्याला तसच निर्घुणपणे संपवण्यात आलं.