AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासाठी डेंजर होते, एका अतिरेक्याचा मृत्यू, तर दुसऱ्याला विष पाजल्याने व्हेटिंलेटरवर

भारतासाठी डेंजर असलेला खालिस्तानी अतिरेकी लखबीर सिंग रोडे याचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्यात आले. तर 2009मधील मुंबईतील हल्ल्याचा मास्टर माइंड साजिद मीर यालाही विष देण्यात आलं आहे. साजिदला तुरुंगात विष देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तो व्हेंटिलेटरवर अखेरच्या घटका मोजत आहे.

भारतासाठी डेंजर होते, एका अतिरेक्याचा मृत्यू, तर दुसऱ्याला विष पाजल्याने व्हेटिंलेटरवर
Sajid MirImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 05, 2023 | 11:43 AM
Share

कराची | 5 डिसेंबर 2023 : खालिस्तांनी अतिरेकी लखबीर सिंग रोडे याचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. रोडे 72 वर्षाचा होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. 2 डिसेंबर रोजीच त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तर, 2009मध्ये झालेल्या मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड साजिद मीरला विष पाजण्यात आलं आहे. त्यामुळे साजित मीर हा व्हेंटिलेटरवर आहे.

खालिस्तानी अतिरेकी लखबीर सिंग रोडे हा पाकिस्तानात लपला होता. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे 2 डिसेंबर रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. मृत्यूनंतर रोडेचा गुपचूप अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

लखबीर सिंग रोडे हा पाकिस्तानची गुप्तचर एजन्सी आयएसआयच्या इशाऱ्यावर भारताच्या विरोधात पंजाबमध्ये अतिरेकी कारवाया करत होता. लखबीर सिंग रोडे हा जनरल भिंडरावाले यांचा पुतण्या आहे. भारताने बंदी घातलेल्या खालिस्तान लिबरेशन फोर्स आणि इंटरनॅओशनल शीख यूथ फेडरेशनला तो पाकिस्तानातून ऑपरेट करत होता. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी तो काम करत असल्याचा त्याच्यावर आरोप होता. अतिरेकी कारवायात सामील झाल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्याने अमृतपाल सिंग याला त्याच्या गावात आश्रय दिला होता. एनआयएने पंजाबच्या मोगा येथील रोडे गावातील लखबीर सिंग रोडे याची जमीन सील केली होती. एनआयएने रोडेवर 2021मध्ये लुधियानातील कोर्टात ब्लास्ट करण्याच्या प्लानिंगचा आरोप केला होता.

विष पाजलं

2009मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड साजिद मीर व्हेंटिलेटरवर आहे. साजित मीर हा लष्कर एत तोयबाचा अतिरेकी आहे. पाकिस्तानच्या लाहोर येथील तुरुंगात तो होता. तुरुंगातच त्याला अज्ञात व्यक्तीने विष पाजल्याचं सांगितलं जातं. विष प्यायल्यानंतर त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली. त्यानंतर त्याला लाहोरच्या तुरुंगातून डेरा गाजी येथे आणण्यात आलं. त्यानंतर त्याला एअरलिफ्ट करून केंद्रीय सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

स्वयंपाक्याने गेम केला?

साजिद हा आयएसआयचा खास माणूस होता. त्याला तुरुंगात ठेवल्यानंतर व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली होती. त्याच्यासाठी खास जेवण बनवण्यासाठी एक स्वयंपाक्याही तैनात करण्यात आला होता. हा स्वयंपाक्या रोज त्याच्यासाठी जेवण तयार करायचा. हा स्वयंपाक्या रोज बाहेर जायचा आणि यायचा. मात्र, साजिद मीर व्हेंटिलेटरवर गेल्यापासून हा स्वयंपाक्या गायब आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था त्याचा कसून शोध घेत आहे. त्यानेच साजिदला विष दिल्याचं सांगितलं जात आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.