Vastu Tips : अंघोळीच्या पाण्यात जरुर मिसळा या गोष्टी, झटक्यात बदलेल नशीब
Vastu Tips: वास्तु तत्वांनुसार, दररोज आंघोळीदरम्यान केलेले छोटे उपाय आपल्या जीवनात लक्षणीय सकारात्मक बदल आणू शकतात. त्याने खूप फरक पडू शकतो. चला जाणून घेऊया या उपायांबद्दल

Vastu Tips : भारतीय घरांमध्ये अंघोळ करणं हे फक्त शरीर स्वच्छ करण्यापुरतं मर्यादित नसतं तर स्नान म्हणज मनातील नकारात्मकता दूर करण्याचाही एक मार्ग मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार, योग्य पद्धतीने आंघोळ केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते. बऱ्याच ठिकाणी आंघोळीच्या पाण्यात मीठ आणि औषधी वनस्पतींसारखे घटक मिसळले जातात. असे मानले जाते की यामुळे शरीरातील आळस दूर होतो आणि मनात सकारात्मक ऊर्जा संचारते. वास्तुशास्त्रानुसार आंघोळीच्या पाण्यात घातल्या पाहिजेत, अशा 5 गोष्टींबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे पैसे, चांगलं नशीब आणि प्रगती होण्यास मदत होते. कोणत्या आहेत त्या गोष्टी ?
काळं मीठ
वास्तुशास्त्रानुसार, काळं मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. आंघोळीच्या पाण्यात काळ मीठ मिसळल्यास ते मानसिक जडपणा आणि थकवा कमी करण्यास मदत करते. यामुळे तुमचा दिवस हलका आणि सकारात्मक पद्धतीने सुरू होतो.
गंगाजल
हिंदू धर्मात गंगेचे पाणी खूप पवित्र मानले जाते. स्नान करताना बादलीतल्या पाण्यात त्याचे काही थेंब टाकल्याने आंघोळ शुद्ध होते. असे मानले जाते की गंगाजल हे आपलं मन शांत करतं तसेच त्यामुळे नकारात्मक विचारसुद्धा दूर होतात.
तुळशीची पानं
हिंदू धर्मात, तुळशीला भगवान विष्णू पूजनीय, प्रिय आणि देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. तुळशीची पाने देखील सकारात्मक उर्जेचा स्रोत मानली जातात. वास्तुशास्त्रानुसार, आंघोळीच्या पाण्यात तुळशीची पाने टाकल्याने मानसिक ताण कमी होतो आणि मन शांत राहते. हा उपाय घरातील सकारात्मक वातावरण राखण्यास देखील मदत करतो.
कडुनिंबाची पानं
वास्तुशास्त्रात कडुलिंबालाही अतिशय शुद्ध मानलं जातं. कडुलिंब हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतं, त्याचप्रमाणे त्याचे आध्यात्मिक गुण देखील तितकेच महत्त्वाचे मानले जातात. असे म्हटले जाते की कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने नकारात्मकता दूर होते आणि दिवसभर शरीर ताजेतवाने राहते.
केशर
वास्तुशास्त्रानुसार केशराला खूप महत्त्व आहे. खरं तर, वास्तुचा संबंध आनंद आणि समृद्धीशी आहे. आंघोळीच्या पाण्यात थोडेसे केशर घातल्याने मन आनंदी होते आणि आत्मविश्वास वाढतो असे मानले जाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
