होर्मुझ स्ट्रेट बंद झाल्याने चीनमध्ये एलपीजी संकट आहे का? तेथे किती दिवसात मिळतोय सिलिंडर ?

होर्मुझची नाकेबंदीने जागतिक तेल बाजाराला हादरा बसला आहे. चीन त्यांच्या ऊर्जा गरजांसाठी या मार्गावर अवलंबून आहे. परंतू चीनच्या विशाल धोरणात्मक इंधन साठ्यामुळे आणि पर्यायी मार्गांमुळे त्याला अजून इतकी झळ बसलेली नाही.

होर्मुझ स्ट्रेट बंद झाल्याने चीनमध्ये एलपीजी संकट आहे का? तेथे किती दिवसात मिळतोय सिलिंडर ?
iran war and lpg shortage
| Updated on: Apr 20, 2026 | 7:31 PM

जगातील सर्वात मोठा इंधनाचा समुद्री मार्ग होर्मुझ स्ट्रेट पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कुटनिती आणि सैन्य तणावाचे केंद्र बनला आहे. इराणच्या अनपेक्षित निर्णयाने जागतिक इंधन बाजारात खळबळ उडाली आहे. ओमान जवळ जहाजावर झालेली फायरिंग आणि स्ट्रेटच्या नाकेबंदीने तेलाच्या किंमती भडकल्या आहेत.भारता सारख्या देशात एलपीजीचा तुटवडा जाणवत आहे. मग याच मार्गातून इंधन घेणाऱ्या भारताचा शेजारील देश चीनची नेमकी स्थिती काय आहे? चीनमध्येही एलपीजी गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत आहे ? अस सवाल केला जात आहे.

होर्मुज स्ट्रेट आणि इराण-चीन कनेक्शन

होर्मुज स्ट्रेट हा केवळ समुद्री मार्गच नाही तर जागतिक तेल व्यापाराची महत्वाचा मार्ग आहे. चीन त्याच्या ऊर्जा गरजेच्या सुमारे ४० ते ४८ टक्के हिस्सा याच मार्गावरुन मागवत आहे. इराणद्वारा स्ट्रेटला बंद करण्याचा थेट अर्थ चीनचा देखील पुरवठा प्रभावित होणे आहे. इराणने हे पाऊल अमेरिकेच्या नाकेबंदी विरुद्ध उचलले आहे. परंतू याचा चीनला देखील फटका बसू शकतो. चीनच्या बंदरापर्यंत पोहचणारा रस्ता बंद होण्याने चीनच्या ऊर्जा सुरक्षेवर दबाव आल्याचे म्हटले जात आहे.

चीनजवळ किती आहे तेल आणि गॅसचा साठा?

चीन भारताच्या तुलनेत या संकटांचा योग्य तऱ्हेने सामना करत आहे. याचे सर्वात मोठा कारण म्हणजे त्याचा विशाल धोरणात्मक तेल साठा म्हटले जाते. अधिकृत आकड्यांनुसार चीन जवळ १३० दिवसांचा कच्चे तेल आणि गॅसचा साठा आहे. यामुळे चीनला याची अजूनही भारतासारखी झळ लागलेली नाही. भारतात जसे घरगुती सिलिंडरसाठी वाट पाहावी लागत आहे. तशी स्थिती चीनमध्ये नाही.चीनने होर्मुझ सारख्या तणावाचा आधीच अंदाज घेतला होता. त्यामुळे चीनने आधीच तेल आणि गॅस स्टॉक पायलिंग करुन ठेवली होती.

चीनमध्ये एलपीजी सिलिंडरची टंचाई ?

चीनमध्ये एलपीजी सिलिंडर नोंदणीसाठी भारतासारखी निश्चित काल मर्यादा वा दिवसांची कमी अशी समस्या आता नाही.तेथील नागरिकांना सिलिंडर मिळण्यात सध्या कोणताही अडथळा नाही. चीनने यासाठी आधीच उपाययोजना केलेल्या आहेत. तेथील व्यवस्थेवर दबाव नक्कीच आहे. मात्र, चीनची अवस्था अगदीच ढेपाळलेली नाही.

रशिया आणि पर्यायी मार्गांचा आधार

होर्मुझ स्ट्रेटवर वाढती निर्भरतेला कमी करण्यासाठी चीनने अनेक वर्षांआधी रशियासोबत मजबूत पाईपलाईन नेटवर्क विकसित केले होते. आज चीनचा मोठा भाग आपला ऊर्जा गरजा जमीनीवर मार्ग आणि पाईपलाईनद्वारे पूर्ण करत आहे. हे मार्ग समुद्री मार्गांपेक्षा संपूर्ण स्वतंत्र आहेत. या पर्यायी मार्ग चीनसाठी या संकटाच्या काळात मोठा गेमचेंजर सिद्ध होत आहे. एवढेच नाही चीन अमेरिका सारख्या देशांकडून इथेनचा देखील रेकॉर्ड आयात करत आहे.जो त्यांच्या एलपीजी आणि नेफ्त्याच्या कमतरतेला भरण्यास मदत करत आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची वाढती क्रेज आणि गॅस खर्चात कमी

गेल्या काही वर्षात चीनमध्ये इलेक्ट्रीक वाहनांची संख्या अभूतपूर्व वाढली आहे. त्याचा थेट परिणाम पारंपारिक इंधन खर्चावर पडला आहे.जसजसे चीनी नागरिक पेट्रोल-डिझेलच्या जागी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर करत आहे. तस तसा उर्जेच्या मागणीचा पॅटर्न देखील बदलत आहे. मात्र, एलपीजीच्या जागतिक किंमतीतील उसळीने चीनच्या खिशावर भार जरुर वाढला आहे. मात्र, परिवहन आणि घरगुती स्तरावर इंधनाच्या मागणीवर आलेल्या घसरणाने चीनला पुरवठा संकटाशी लढण्यासाठी बफर प्रदान केला आहे.

नाकेबंदी वाढली तर परिणाम निश्चित

होर्मुझ स्ट्रेटचे बंद होणे निश्चित रुपाने जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा इशारा आहे. मात्र, चीन सध्या सुरक्षित स्थितीत आहे. मात्र, ही नाकेबंदी जर वाढली तर जागतिक बाजारपेठेत एलपीजीच्या किंमत अधिक वाढू शकतात. ज्याचा परिणाम चीन सोबत जगातील इतर देशांवर देखील होऊ शकतो. चीनने आपल्या ऊर्जेवरील अवलंबित्व अधिक वैविध्यपूर्ण करण्याची वेळ आली आहे. भविष्यात चीन हे अवलंबित्व कसे कमी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, जेणेकरून होर्मुझ वादासारख्या कोणत्याही सागरी विवादांचा त्याच्या देशांतर्गत खाद्यपुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होणार नाही.

 

 

Follow Us