भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, इराणचा मोठा निर्णय, होर्मुज खाडीतून भारताची..

इराण आणि अमेरिका युद्धात जगातील अनेक देश होरपळत असताना भारतासाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी आली आहे. भारताने थेट मोठी बाजी मारली आहे. इराण अमेरिका युद्धाचा फटका भारतालाही बसत असून भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे.

भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, इराणचा मोठा निर्णय, होर्मुज खाडीतून भारताची..
LPG gas ship
| Updated on: Mar 27, 2026 | 8:41 AM

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगातील अनेक देशांमध्ये गॅस आणि कच्च्या तेलाचा तुटवडा आहे. इराणकडून महत्वाची होर्मुज खाडी बंद करण्यात आली. यासोबतच आखाती देशात असलेल्या एलपीजी गॅसच्या प्रकल्पांवर हल्ला करण्यात आला. जग एका वेगळ्या संकटात आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. या तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी अमेरिकेकडून रशियाकडून तेल खरेदी करण्याचे आवाहन केले. यासोबतच इराणच्या कच्च्या तेलावर आणि गॅसवर असलेले निर्बंध एक महिन्याकरिता उठवण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धात जगातील अनेक देश भरडले जात आहेत. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. यातून मार्ग भारताकडून काढला जात आहे. मात्र, जग कच्चे तेल आणि गॅसच्या एका वेगळ्या संकटात सापडले आहे. हे युद्ध थांबवण्याकरिता इराणकडून काही अटी ठेवण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्धात इराण मागे हटताना दिसत नाहीये.

इराणकडून युद्धात होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने भारतात एलपीजी आणि कच्च्या तेलाचा हवा तेवढा पुरवठा होत नाही. भारताचे काही जहाज इराणकडून सोडले जात आहेत. भारतात एलपीजी गॅस होर्मुज मार्गेच दाखल होतो. भारताचे काही जहाज सध्याच्या घडीला होर्मुजमध्ये अडकून पडले आहेत. इराणकडून भारतासाठी होर्मुज खाडी खुली करण्यात आली. मात्र, तिथे जहाजांचे मोठे जाम आहे.

आता भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी येताना दिसत आहे. एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबत ही बातमी आहे. ‘जग वसंत’ नावाचा एक टँकर कांडला बंदरात पोहोचले आहे. विशेष म्हणजे हे एलपीजी गॅस असलेले जहाज होर्मुज मार्गेच भारतात दाखल झाले. या जहाजातून 42 हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त एलपीजी गॅस आणण्यात आला आहे.

हे जहाज अशावेळी भारतात दाखल झाले, ज्यादरम्यान गॅसची टंचाई आहे. कांडला बंदर हे भारतातील सर्वात मोठ्या ऊर्जा आयात बंदरांपैकी एक आहे. येथून देशाच्या विविध भागांमध्ये एलपीजी गॅसची वाहतूक केली जाते. तिथेच आता हे जहाज पोहोचले आहे. होर्मुजमध्ये स्थिती गंभीर असतानाही भारतात तिथून जहाज दाखल होत आहेत. सरकारकडून युद्धाच्या स्थितीत अनेक प्रयत्न करून देशात एलपीजी गॅस आणि कच्चे तेल आणले जात आहे.

Follow Us