भारतात हाहाकार! भारताच्या दिशेने निघालेल्या जहाजावर गोळीबार, थेट इराणने केले जप्त, होर्मुज खाडीत तांडव, काही वेळात..
इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडीत तणाव अधिक वाढल्याचे बघायला मिळत आहे. भारतासाठी अत्यंत वाईट बातमी होर्मुज खाडीतून येत आहे. भारताची झोप उडाली आहे. इराणकडून होर्मुज खाडीत अजून एक मोठा दणका भारताला देण्यात आला.

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी युद्धाचे रणागंण बनले आहे. इराण आणि इस्त्रायलच्या शहरी भागाहून थेट समुद्रात युद्ध पोहोचले. त्यामध्येच होर्मुज खाडीत तणाव वाढत आहे. भारतासाठी खळबळ उडवणारी बातमी पुढे येत आहे. होर्मुज खाडीत अचानक मोठी खळबळ उडाली आहे. इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने मोठे दोन जहाज जप्त केले आहेत. धक्कादायक म्हणजे त्यापैकी एक भारताच्या दिशेने जहाज येत होते. इराणच्या या कारवाईने भारताची झोप उडाली. आयआरजीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी एमएससी-फ्रान्सिस्का आणि एपामिनोंडास ही जहाजे जप्त केली आहेत. ही जहाजे जप्त केल्यानंतर इराणकडून आरोप करण्यात आला की, ही जहाजे आवश्यक परवानग्यांशिवाय कार्यरत होती.
नेव्हिगेशन प्रणालीत फेरफार करण्यात आला होता. याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की, एपामिनोंडास नावाचे कंटेनर जहाज लायबेरियन ध्वजाखाली जात होते. दुबईच्या जेबेल अली बंदारातून ते गुजरातच्या दिशेने निघाले होते. मात्र, त्याला होर्मुज खाडीत थांबवण्यात आले. इराणी सैन्याने या जहाज थांबण्याचा इशारा दिला. मात्र, जहाज थांबले नाही आणि त्यांनी उल्लंघन केले.
मग आयआरजीसीने त्याच्यावर गोळीबार केला. ज्यावेळी आयआरजीसीने जहाजाला थांबण्याचा इशारा दिला. त्यावेळी जहाज 6 सागरी मैल दूर होते. हेच नाही तर जहाज जप्त केल्याचा व्हिडीओ देखील पुढे आला. त्यानंतर थोड्याच वेळात, एमएससी फ्रान्सिस्काला देखील रोखण्यात आले आणि इराणकडून जप्त करण्यात आले. होर्मुज खाडीत स्थिती अधिक तणावपूर्वक बघायला मिळत आहे.
IRGC released footage of the interception of two vessels, MSC-FRANCESCA and EPAMINODES, after maritime violations in the Strait of Hormuz.
Follow: https://t.co/mLGcUTS2ei pic.twitter.com/ZUUBbzbA2N
— Press TV 🔻 (@PressTV) April 22, 2026
18 एप्रिल रोजी भारताच्या जहाजावर गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता थेट भारताचे जहाज जप्त करण्यात आले. हे जहाज गुजरातच्या दिशेने निघाले होते. होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता प्रयत्न केली जात होती. यादरम्यानच ही घटना घडली. आता यावर भारताकडून नक्की काय भूमिका घेतली जाते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. शिवाय होर्मुज खाडीत अडकलेल्या इतर जहाजांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. होर्मुज खाडीत अमेरिकेकडून मोठी नाकेबंदी करण्यात आली. त्यानंतर इराण अधिक आक्रमक होताना दिसत आहे.