AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प यांचा मोठा दणका, H-1B व्हिसाधारकांचा ग्रेस पीरियड रद्द होणार? भारतीय कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

Trump on H-1B visa : भारतीयांसह इतर देशातील कर्मचाऱ्यांवर अमेरिकेतून बाहेर पडण्याची पुन्हा टांगती तलवार लटकली आहे. H-1B व्हिसाधारकांचा ग्रेस पीरियड रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काय आहे याविषयीची अपडेट?

ट्रम्प यांचा मोठा दणका, H-1B व्हिसाधारकांचा ग्रेस पीरियड रद्द होणार? भारतीय कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Sep 11, 2026 | 8:49 AM
Share

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने परदेशातील कुशल कामगार, आयटी इंजिनिअर्स, काही वर्षांसाठी नोकरीवर जाणाऱ्यांच्या जीवाला पुन्हा घोर लावला आहे. H-1B व्हिसाधारकांचा ग्रेस पीरियड रद्द होण्याची भीती व्यक्त होत आहे. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने एक प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार, अमेरिकेत नोकरी गमावल्यानंतर कर्मचाऱ्यांना अमेरिकेत राहण्यासाठी मिळणारा 60 दिवसांचा सवलतीचा कालावधी, ग्रेस पीरियड पूर्णपणे रद्द करण्याची योजना आहे. हा नियम लागू झाला तर परदेशी कर्मचाऱ्यांना तात्काळ हा देश सोडावा लागेल. अथवा नोकरी संपण्यापूर्वीच नवीन नोकरी तात्काळ मिळवावी लागेल.

टेक कर्मचारी पुन्हा धास्तावले

नोकरी गमावल्यानंतर नवीन प्रायोजक, कंपनी तात्काळ मिळाली नाहीतर अमेरिकेतून तात्काळ अशा कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा हा प्रस्ताव आहे. त्यांना सवलतीचा 60 दिवसांचा कालावधी मिळणार नसल्याने मोठा धक्का बसणार आहे. भारतीयच नाहीतर इतर देशातील टेक कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. विशेषतः भारत आणि चीनच्या कर्मचाऱ्यांची यामुळे डोकेदुखी वाढेल.

यापूर्वी 2017 मध्ये एखाद्या परदेशी कर्मचाऱ्याची नोकरी गेल्यास, त्याला कामावरून काढून टाकल्यास त्याला 60 दिवसांचा ग्रेस टाईम, ग्रेस पीरियड मिळत होता. पण आयटी कंपन्यांमध्ये सध्या नोकर कपातीचे लोण पसरले आहे. या नवीन प्रस्तावाचा सर्वात मोठा फटका भारतीय कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

अमेरिका फर्स्ट आक्रमक धोरण

नवीन प्रस्ताव हा केवळ H-1B व्हिसाधारकांपुरताच मर्यादीत नसेल. तर L-1, O-1, E-1, E-3 आणि TN या श्रेणीतील व्हिसाधारकांनाही ट्रम्प प्रशासन हिसका दाखवण्याची शक्यता आहे. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी प्रस्तावानुसार 60 दिवसांचा सवलतीचा कालावधी हा रोजगार आधारीत व्हिसा धोरणाशी सुसंगत नाही. जर परदेशी कर्मचाऱ्याची नोकरी संपली असेल, गमावली असेल तर त्याने तात्काळ देश सोडावा. त्याठिकाणी अमेरिकेतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. अमेरिका फर्स्टचे धोरण ट्रम्प प्रशासन आक्रमकपणे राबवण्याची शक्यता आहे.

या प्रस्तावावर आता जनतेच्या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यासाठी 60 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. दोन महिन्यात आलेल्या प्रतिक्रियानंतर या प्रस्तावाविषयी ट्रम्प प्रशासन अंतिम निर्णय घेईल. हा निर्णय झाला तर हजारो भारतीय आणि चीनी नागरिकांना अमेरिकेतून परागंदा व्हावे लागेल. घर विक्रीपासून ते मुलांचे शिक्षणापर्यंतची मोठी समस्या निर्माण होईल.

Follow Us
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप