अमेरिकेचा भारतीय आयटी कंपन्यांना मोठा धक्का; अमेरिकेतील भारतीयांनाही दणका
या निर्णयामुळे आता या कंपन्यांना त्यांच्या H-1B कर्मचाऱ्यांसाठी नवीन ग्रीन कार्ड अर्ज दाखल करता येणार नाहीत किंवा प्रलंबित अर्जांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

The US has excluded Indian IT companies from the Green Card program.
अमेरिकेच्या कामगार विभागाने भारतीय आयटी क्षेत्राला मोठा धक्का दिला आहे. इन्फोसिस, टीसीएस (टाटा), विप्रो, एचसीएल, कॉग्निझंट आणि कॅपजेमिनीसह मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोब या ८ प्रमुख आयटी कंपन्यांना ‘परमनंट लेबर सर्टिफिकेशन’ या ग्रीन कार्ड प्रोग्रॅममधून तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि कामगार सचिव कीथ सोंडरलिंग यांनी ही घोषणा करताना, या कंपन्यांनी एच-१ बी व्हिसा नियमांचा गैरवापर करून अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या हिरावून घेतल्याचा आणि वेतन दडपल्याचा आरोप केला आहे.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us