भारताच्या शेजारी देशात मोठा हाहाकार!बांगलादेशात पुन्हा मोठी हिंसा, थेट देशभरात..

बांगलादेशात काही दिवसांपूर्वी मोठा हिंसाचार बघायला मिळाला. अर्ध्या रात्रीत पंतप्रधानांसह मंत्र्यांना देशातून पळून जावे लागले. बागंलादेशात आता पुन्हा एकदा स्थिती गंभीर होताना दिसत आहे. मोठा हिंसाचार बांगलादेशात बघायला मिळतोय.

भारताच्या शेजारी देशात मोठा हाहाकार!बांगलादेशात पुन्हा मोठी हिंसा, थेट देशभरात..
Bangladesh
| Updated on: Nov 19, 2026 | 8:56 AM

बांगलादेशात काही दिवसांपूर्वी मोठी अशांतता बघायला मिळाली. शेख हसीना यांच्यासह मंत्र्यांना अर्ध्या रात्रीत देश सोडावा लागला. त्यानंतर काही दिवसांनंतर बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून तारीक रहमान यांनी सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र, आता पुन्हा बांगलादेशात हाहाकार उडाला. बांगलादेश पुन्हा एकदा राजकीय हिंसाचार आणि जाळपोळीच्या विळख्यात सापडला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष जो आता प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्या अवामी लीगने लॉकडाऊन पुकारले. राजधानी ढाकासह अन्य भागात देशी बनावटीचे बॉम्बस्फोट झाली. मागच्या दोन दिवसांपासून बांगलादेशच्या विविध भागात बॉम्बस्फोट होत आहेत. राजशाही, बारीसाल, फरीदपूर या यूनुसच्या काही ग्रामीण बॅंकांना टार्गेट करून स्फोट घडवले जात आहेत. चितगावच्या पंचलाईश भागात अंतरिम सरकारचे माजी प्रमुख मुहम्मद युनूस यांच्या वडिलोपार्जित घराला अज्ञात व्यक्तींनी आग लावली.

शेख हसीना यांच्या सरकारनंतर मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सुत्रे आपल्या हातात घेतली होती. रिपोर्टनुसार, पंतप्रधान तारिक रहमान यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर ढाकातील अवामी लीग नेत्यांच्या घरावर हल्ले केले आणि आग लावली. 28 ठिकाणी बॉम्बस्फोट केले तर मोठ्या प्रमाणात गाड्या पेटून देण्यात आल्या.

Loading...

काही लोक या हिंसाचारात गंभीर जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना सत्तेतील पक्षातील स्थानिक नेत्याला मारले. ज्यानंतर भडका उडाला. फरीदपूर आणि पिरोजपूरमध्ये एक एक बीएनपीच्या स्थानिक नेत्याला संपवण्यात आले. शेख हसीना यांना बांगलादेशात आणण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. शेख हसीना सध्या भारतात आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला हसीना यांनी घोषणा केली की, काहीही किंमत मोजावी लागली तरी अगदी मृत्यूदंडाची शिक्षा समोर असली तरीही त्या डिसेंबर महिन्यात बांगलादेशात परतणार आहेत. त्यानंतरच तणाव हा वाढला. बुधवारी रात्री तारिक रहमान यांनी अवामी लीगला दहशतवादी संघटना आणि पराभूत फॅसिस्ट शक्ती असे संबोधले. लोकशाहीवादी शक्तींना एकत्र येण्याचे आवाहन केले. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित एका खटल्यात शेख हसीना यांना त्यांच्या अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us