
Maldive india Row : भारत आणि मालदीव या दोन देशातील संबंध सध्या ताणले गेले आहेत. नवीन सरकार आल्यापासून ते भारताविरोधात भूमिका घेत आहेत. कारण नवे राष्ट्राध्यक्ष मुईज्जू हे चीन समर्थक मानले जातात. त्यांना चीनकडून मदतीची आशा आहे. मालदीववर चीनचे बरेच कर्ज आहे. पण चीन मदत करुन कशा प्रकारे देशांना आपला गुलाम बनवतो हे त्यांच्या अजून लक्षात आले नसावे. सध्या चीनच्या इशाऱ्यावर तो भारताविरुद्ध विष ओकत आहे. पण जर आपण मालदीवचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येईल की भारताने अनेकदा गरज असताना मालदीवला मदत केलीये. जेव्हा जेव्हा मदतीची गरज भासली तेव्हा तेव्हा भारताने आपल्या शेजारीला आणि छोट्या देशांना मदत केली आहे.
मालदीव हा आशियातील क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने हिंद महासागरातील सर्वात लहान देश आहे. सुमारे 1200 बेटांपासून हा देश बनला आहे. जो त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. इथल्या संस्कृतीवर दक्षिण भारत आणि श्रीलंकेचा प्रभाव दिसतो.
इ.स.पूर्व पाचव्या शतकापूर्वी मालदीव प्रथम स्थायिक झाले असे ऐतिहासिक पुरावे आणि दंतकथा सांगतात. पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांमध्ये एकमत आहे की मालदीवचे पहिले रहिवासी मुस्लीम नव्हते. त्यांच्या मते, मालदीवमध्ये स्थायिक झालेले पहिले लोकं हे गुजराती भारतीय होते, जे प्रथम 500 ईसापूर्व श्रीलंकेत पोहोचले आणि नंतर तेथून मालदीवमध्ये स्थायिक झाले.
महावंश शिलालेख, अनुराधापुराच्या महासेनेच्या काळातील श्रीलंकेचा ऐतिहासिक इतिहास यामध्ये श्रीलंकेतून मालदीवमध्ये लोकं कसे स्थायिक झाले याचा उल्लेख आहे. काही इतिहासकार असे देखील सांगतात की, मालदीवमध्ये सिंधू संस्कृतीच्या काळातही याआधी वस्ती झाली असावी, परंतु मालदीवमधील पुरातत्व उत्खननात सापडलेल्या वस्तू इस्लामिक काळापूर्वी देशात हिंदू धर्माच्या अस्तित्वाचा ठोस पुरावा देतात.
अल्लामा अहमद शिहाबुद्दीन यांनी १७ व्या शतकात लिहिलेल्या फि अथर मिधू अल-कधिमा (मिधूच्या प्राचीन अवशेषांवर) या पुस्तकात असे नमूद केले आहे की मालदीवचे पहिले रहिवासी ढेवीस म्हणून ओळखले जात होते आणि ते कालीबंगन (राजस्थान), भारतातून आले होते.
पुस्तकात असेही म्हटले आहे की या द्वीपसमूहात इस्लामचा प्रसार होण्यापूर्वी येथे बौद्ध धर्म प्रचलित होता, जो इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या विस्तार मोहिमेचा एक भाग असावा. सम्राट अशोक पाटलीपुत्रच्या जगप्रसिद्ध आणि शक्तिशाली मौर्य वंशाचे महान सम्राट होते. अशोक हे बौद्ध धर्मातील सर्वात वैभवशाली राजा होते. सम्राट अशोकाचे पूर्ण नाव देवनामप्रिया अशोक होते. त्यांची कारकीर्द इ.स.पूर्व 304 ते 232 बीसी दरम्यान होती. पाटलीपुत्र म्हणजे आजचे पाटणा.
इतिहासकारांच्या मते, मालदीवमध्ये सापडलेले बहुतेक पुरातत्वीय अवशेष हे बौद्ध स्तूप आहेत, ज्यांच्या रचना अर्धवर्तुळाकार आहेत आणि बौद्ध भिक्खू आणि नन यांनी ध्यान आणि मठाच्या हेतूंसाठी वापरल्या होत्या.
मालदीवच्या प्रसिद्ध न्यूज पोर्टल ‘द एडिशन’ने दिलेल्या वृत्तानुसार, मालदीवमध्ये इस्लामचा उदय हे अचानक झाले नव्हते. 12 व्या शतकात अरब व्यापाऱ्यांच्या आगमनाने याची सुरुवात झाली होती. अरब व्यापाऱ्यांचे तत्कालीन बौद्ध राजांशी संबंध निर्माण होऊ लागले. नंतर सापडलेल्या ताम्रपटांनुसार, मालदीवचा बौद्ध राजा धोवेमी कालामिंजा सिरी थिरिबुवाना-अदित्था महारादुन याने 1153 किंवा 1193 मध्ये इस्लाम स्वीकारला. त्यानंतर येथे इस्लामचा प्रसार सुरू झाला.
इतिहासकारांच्या मते, मालदीव पारंपारिकपणे हिंदू राष्ट्रातून बौद्ध राष्ट्रात बदलले, नंतर 12 व्या शतकाच्या आसपास इस्लाममध्ये रूपांतरित झाले. इतिहासकारांनी याचे श्रेय अबू अल-बरकत युसूफ अल-बरबारीला दिले आहे. काही लोक मालदीवच्या इस्लामीकरणाचे श्रेय मोरोक्कोहून आलेल्या लोकांना देतात. मालदीव हे 12 व्या शतकापासून मुस्लीम राष्ट्र आहे.