Mona Lisa: 6748 कोटींच्या मोनालिसाच्या पेंटिंगवर फेकला केक; वृद्ध महिलेच्या वेशात केला प्रवेश, पहा Video

लिओनार्डो दा विंची यांच्या या पेंटिंगची सध्याची बाजारातील किंमत ही जवळपास 6748 कोटी रुपये इतकी आहे. मोनालिसाची ही पेंटिंग सुमारे 500 वर्षांपूर्वीची आहे.

Mona Lisa: 6748 कोटींच्या मोनालिसाच्या पेंटिंगवर फेकला केक; वृद्ध महिलेच्या वेशात केला प्रवेश, पहा Video
जगप्रसिद्ध मोनालिसाच्या पेंटिंगवर फेकला केक
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: May 31, 2022 | 4:06 PM

पॅरिसमधील लौरे म्युझियममधील (louvre museum) एका प्रेक्षकाने जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिंग्सपैकी एक असलेल्या मोनालिसाच्या (Mona Lisa) पेंटिंगवर केक फेकला. पॅरिसमधील या प्रसिद्ध म्युझियममध्ये रविवारी तो व्यक्ती वृद्ध महिलेच्या वेशात आला होता. संबंधित व्यक्तीने महान चित्रकार लिओनार्डो दा विंची (Leonardo da Vinci) यांच्या मोनालिसा या उत्कृष्ट पेंटिंगला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मोनालिसाच्या पेंटिंगवर केक फेकताना एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. पेंटिंगवर केकवरील क्रीम फेकतानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले. मात्र सुदैवाने बुलेटप्रूफ काचेच्या मागे ठेवलेल्या पेंटिंगचं यात कोणतंही नुकसान झालं नाही. हे कृत्य करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. लिओनार्डो दा विंची यांच्या या पेंटिंगची सध्याची बाजारातील किंमत ही जवळपास 6748 कोटी रुपये इतकी आहे. मोनालिसाची ही पेंटिंग सुमारे 500 वर्षांपूर्वीची आहे.

नेमकं काय घडलं?

36 वर्षीय व्यक्ती एका वृद्ध महिलेच्या वेशात व्हिलचेअरवर संग्रहालयात आला आणि मोनालिसाच्या पेंटिंगसमोर तो काही काळ थांबला. यानंतर तो अचानक उठला आणि त्याने सोबत आणलेला केक पेंटिंगच्या दिशेने फेकला. हा केक पेंटिंगसमोर असलेल्या बुलेटप्रूफ काचेला चिकटला. या अनपेक्षित घटनेमुळे संग्रहालयातील उपस्थित लोक दचकले. अवघ्या काही क्षणांतच या व्यक्तीला अटक करण्यात आली. “व्हिलचेअरवर बसलेला एक माणूस अचानक उठला आणि पेंटिंगच्या दिशेने चालू लागला. डिस्प्लेची काच फोडण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झाल्यानंतर त्याने पेंटिंगवर केक फेकला. त्याने संपूर्ण काचेच्या पॅनेलवर क्रीम लावला,” अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

पहा व्हिडीओ-

सोशल मीडियावरील व्हायरल या व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती संग्रहालयात येणाऱ्यांना ओरडताना दिसत आहे. या हल्ल्यामागील हेतू अद्याप अस्पष्ट असून त्या व्यक्तीने या म्युझियममध्ये केक कसा आणला याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.