AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किम जोंग उनच्या हातावर तुरी, उत्तर कोरियाच्या नागरिकाने अशी ओलांडली बॉर्डर

उत्तर कोरियाच्या नागरिकांना देशाबाहेर पडण्याची परवानगी नाही. मात्र आता एका व्यक्तीने उत्तर कोरियाच्या सुरक्षेचे उल्लंघन करून दक्षिण कोरियाच्या सीमेत प्रवेश केला असल्याचे समोर आले आहे.

किम जोंग उनच्या हातावर तुरी, उत्तर कोरियाच्या नागरिकाने अशी ओलांडली बॉर्डर
kim jong un
| Updated on: Jul 04, 2025 | 7:21 PM
Share

उत्तर कोरियाच्या नागरिकांना देशाबाहेर पडण्याची परवानगी नाही. या देशातील नागरिकांवर वेगवेगळे निर्बंध आहेत. अशातच आता एका व्यक्तीने उत्तर कोरियाच्या सुरक्षेचे उल्लंघन करून दक्षिण कोरियाच्या सीमेत प्रवेश केला असल्याचे समोर आले आहे. उत्तर कोरियाची सीमा ओलांडणे हे अतिशय अवघड काम आहे. मात्र तरीही या व्यक्तीने मोठ्या संयमाने सीमा ओलांडली. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

न्यूज डॉट एजने जॉइंट चीफ ऑफ स्टाफच्या एका अधिकाऱ्याचा हवाल्याने सांगितले की, ‘सीमा ओलांडल्यानंतर दक्षिण कोरियाच्या सैनिकांनी गुरुवारी रात्री उशिरा त्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी नेले. तो उत्तर कोरियाचा नागरिक होता जो त्याच्या देशातून पळून आला होता. महत्वाची बाब म्हणजे तो 20 तास न हलता एकाच ठिकाणी पडून राहिला होता, यामुळे त्याच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. देशातील माहिती बाहेर जाईल यामुळे उत्तर कोरिया कधीही आपल्या नागरिकांना सीमा ओलांडू देत नाही.

आरोपीची चौकशी सुरू

सध्या दक्षिण कोरियाचे अधिकारी या व्यक्तीची चौकशी करत आहेत. त्याने उत्तर कोरियाचा नागरिक असल्याचे सांगितले आहे. आता तो दक्षिण कोरियाच्या सैनिकांच्या ताब्यात आहे. दक्षिण सैनिकांनी सांगितले की, ‘तो नि:शस्त्र होता, परंतु तो 20 तास एकाच जागी पडून होता. तो हालचाल करू लागला तेव्हा त्याला पकडण्यात आले आता त्याला तपास अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे.’

संयुक्त राष्ट्रांना दिली माहिती

या व्यक्तीबाबत संयुक्त राष्ट्रांना माहिती देण्यात आली आहे. या कृत्यामागे कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, या व्यक्तीला जाणूनबुजून बाहेर पाठवण्यात आले तर नाही ना असा तपासही सुरु आहे. कारण उत्तर कोरियाच्या सीमेवर 24 तास पहारा असतो, त्यामुळे सीमा ओलांडणे सोपे काम नाही.

डीएमझेड म्हणजे काय?

उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी डीएमझेड झोन तयार केले आहे. हा भाग 4 किलोमीटर रुंद बफर झोन आहे. या भागावर दोन्ही बाजूंनी कडक पहारा ठेवण्यात आला आहे. उत्तर कोरियाचे लोक चीनच्या उत्तर सीमेवरून दक्षिण कोरियाला जातात, मात्र खूप कमी लोक या भागातून सीमा पार करतात. ऑगस्ट 2024 मध्ये उत्तर कोरियाच्या एका सैनिकाने दक्षिण कोरियात प्रवेश केला होता.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक