Hajj : आले भक्ताच्या मना तिथे कुणाचे चालेना, हजला जाण्यासाठी तब्बल 6,500 किलोमीटर चालला, वाचा अपार भक्तीचा प्रवास

तो दिवसाला सरासरी 17.8 किमी चालत 26 जून रोजी मक्का येथील आयशा मशिदीत पोहोचला. भक्तांच्या मोठ्या जमावाने तसेच स्थानिक रहिवासी आणि यूकेहून आलेल्या त्यांच्या दोन मुलींनी पवित्र शहरात त्यांचे स्वागत केले.

Hajj : आले भक्ताच्या मना तिथे कुणाचे चालेना, हजला जाण्यासाठी तब्बल 6,500 किलोमीटर चालला, वाचा अपार भक्तीचा प्रवास
हजला जाण्यासाठी तब्बल 6,500 किलोमीटर चालला
Image Credit source: Arab News
दादासाहेब कारंडे

|

Jul 06, 2022 | 11:55 PM

मुंबई : भक्तीचा नाद (God Devotion) माणासाला किती प्रेरीत करतो हे आपण आपल्या विठोबाच्या वारीने वर्षांनुवर्षे (Pandharpur Wari) पाहतोयच. मात्र आता ब्रिटमधील एका भक्ताने हजला (Hajj) जाण्यासाठी तब्बल 6,500 किलोमीटरचे अंतर पार केलंय तेही चालत. त्यामुळे हा भक्त सध्या सगळीकडे ट्रेंड होतोय.  ब्रिटीश नागरिक अॅडम मोहम्मदने हज करण्यासाठी पायी मक्केला जाण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. 52 अॅडमने नेदरलँड, जर्मनी, झेक प्रजासत्ताक, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया, तुर्की, लेबनॉन, सीरिया आणि जॉर्डनमधून 11 महिने आणि 26 दिवसांत जवळपास 6,500 किलोमीटरचे अंतर कापून सौदी अरेबियाला पोहोचले. तो दिवसाला सरासरी 17.8 किमी चालत 26 जून रोजी मक्का येथील आयशा मशिदीत पोहोचला. भक्तांच्या मोठ्या जमावाने तसेच स्थानिक रहिवासी आणि यूकेहून आलेल्या त्यांच्या दोन मुलींनी पवित्र शहरात त्यांचे स्वागत केले.

पोहोचल्यावर काय म्हणाला?

माझा प्रवास संपवताना मला खूप आनंद झाला आणि सौदी आणि इतर राष्ट्रीयत्वांचे मोठे स्वागत, औदार्य आणि प्रेम पाहून मी भारावून गेलो. मी हज करण्यासाठी खूप उत्सुक आहे कारण हज हे माझे सर्वात मोठे स्वप्न आहे, अशी प्रतिक्रिया त्याने यावेळी माध्यमांना दिली आहे. अराफात पर्वतावर उभे राहून तो काय करेल याबद्दलही त्याने सांगितले.हा प्रवास शक्य केल्याबद्दल आणि हज करण्याचे माझे सर्वकालीन ध्येय पूर्ण केल्याबद्दल मी अल्लाहचे आभार मानेन. हा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता पण अल्लाह आणि मानवतेसाठी मला सर्वस्वाचा त्याग करावा लागला. असेही तो यावेळी म्हणाला.

कोरोना कुराण वाचलं

कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादल्यापासून मी पवित्र कुराण वाचण्यात व्यस्त आहे. अचानक एके दिवशी मला जाग आली आणि माझ्या आतल्या आवाजाने मला सांगितले की माझ्या घरापासून पायीच मक्केला जा. मी या आवाजाकडे दुर्लक्ष करू शकलो नाही आणि त्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. एका ब्रिटीश संस्थेच्या मदतीने आणि आपल्या देशबांधवांकडून मिळालेल्या देणग्यांमुळे कठीण प्रवासाची तयारी करण्यासाठी त्याला फक्त दोन महिने लागले.

जेवला, आराम कुठे केला?

इराकी-कुर्दिश असलेल्या मोहम्मदने 1 ऑगस्ट 2021 रोजी वॉल्व्हरहॅम्प्टन येथील त्याच्या घरापासून प्रवास सुरू केला. त्याच्याकडे त्याच्या वैयक्तिक सामानासाठी 250 गाडी होती. या गाडीबाबतही तो सांगतो, खरं तर मी ते स्वतः बनवले आहे. तिथेच मी प्रवासासाठी जेवलो, झोपलो आणि स्वयंपाक केला. हवामान आणि प्रवास वगळता, मक्काला जाताना त्याला इतर कोणत्याही आव्हानाचा सामना करावा लागला नाही, असेही तो म्हणाला.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें