पॉर्न स्टार सुंदरीच्या प्रेमात आकंठ बुडाले विवाहित खासदार! तिच्यासाठी राजकारणही सोडणार

कोण आहेत ते खासदार महोदय, जे पॉर्नस्टारच्या प्रेमात बायको-मुलांना सोडायला निघालेत?

पॉर्न स्टार सुंदरीच्या प्रेमात आकंठ बुडाले विवाहित खासदार! तिच्यासाठी राजकारणही सोडणार
कोण आहे तो खासदार जो हिच्या प्रेमात पडला?Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 2:27 PM

जर्मनीतील एक विवाहित खासदार महोदय चक्क पॉर्न स्टार तरुणीच्या प्रेमात पडले असल्याची चर्चा सोशल मीडियात तुफान सुरु आहे. पॉर्न स्टार तरुणीच्या प्रेमात ते इतके आकंठ बुडालेत की आपल्या बायको आणि मुलांना सोडून या तरुणीसोबत आपलं उरलेलं आयुष्य घालवण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलेत. त्यासाठी ते राजकारणदेखील सोडणार असल्याच्या बातम्या समोर आल्यात. पॉर्न स्टार तरुणीच्या प्रेमात पडलेल्या या खासदार महोदयांचं वय 44 वर्ष असून त्यांचं नाव आहे हेगन रेनहोल्ड.

हेगन रेलनहोल्ड हे जर्मनीच्या फ्री डेमोक्रेटिक पार्टीचे खासदार आहेत. हा पक्ष सध्या इतर पक्षांसोबत आघाडी करुन सत्तेत आहे. 2017 साली ते खासदार म्हणून निवडून आले होते.

विशेष म्हणजे या विवाहित खासदाराची पत्नीदेखील खासदार आहे. दोघांच्या लग्नाला 16 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना 3 मुलं आहेत. अशातच आता हेगन यांनी पॉर्न स्टार तरुणीला आपला जोडीदार बनवण्याचा निर्णय घेतलाय.

ज्या पॉर्न स्टार तरुणीच्या प्रेमात खासदार महोदय पडले आहेत, तिचं नाव आहे एनीनी सेमेलहाक. ती 43 वर्षांची आहे. ती अनेक पॉर्न फिल्ममध्ये काम करुन धाली आहे. तिने काही महिन्यांपूर्वी एका करोडपती इसमाशी लग्न केलं होतं. त्यानंतर ती बराच वेळ चर्चेतही होती. आता एनीना आणि हेगन यांच्या प्रेमसंबंधांनी तुफान चर्चा रंगली आहे.

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, हेगन आणि एनीना हे एका सरकारी मेंटरशिर सेशन दरम्यान एकमेकांना भेटले होते. त्यानंतर त्यांची ओळख वाढली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. एनीना येत्या काळात निवडणूकही लढवू शकते, अशी देखील शक्यता वर्तवली जाते आहे.

दरम्यान, हेगन यांची पत्नी यांनीही या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. गेले काही महिने आपल्यासाठी कठीण होते, असं हेगन यांची पत्नी खासदार कॅरोलीन यांनी म्हटलंय. त्यांनीही राजकारणासून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या आता पुन्हा बर्लिनला परतणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.