स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये हाहाकार, जहाजाचा भीषण स्फोट, जगाची चिंता वाढली

स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून जाणारं एक मोठं जहाज समुद्री माईनला धडकलं आहे. त्यानंतर प्रचंड मोठा स्फोट या ठिकाणी झाला आहे. इराणच्या न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार हे जहाज स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये रस्ता चूकलं आणि त्यानंतर समुद्री माईनला धडकलं.

स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये हाहाकार, जहाजाचा भीषण स्फोट, जगाची चिंता वाढली
strait of hormuz
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 26, 2026 | 7:33 PM

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्धाला सुरुवात झाली होती, हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होतं. या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं, इराणच्या पायाभूत सुविधा नष्ट झाल्या. दरम्यान दुसरीकडे इराणकडून देखील इस्त्रायलवर ड्रोन आणि रॉकेट हल्ले करण्यात आले तसेच मध्य पूर्वीत अमेरिकेची सैन्य तळं जिथे-जिथे होती, तिथे देखील इराणकडून हल्ला करण्यात आला, या हल्ल्यांमध्ये इस्त्रायल आणि अमेरिकेचं देखील नुकसान झालं. दरम्यान या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्याचा निर्णय घेतला. इराणने हा मार्ग बंद करण्यासाठी या रस्त्याच्या मार्गात अनेक ठिकाणी समुद्री माईन पेरून ठेवले होते. तसेच या मार्गाने कोणत्याही व्यापारी जहाजांनी जाऊ नये, जाण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यावर हल्ला करू असा इशाराही इराणकडून देण्यात आला होता.

दरम्यान स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्यामुळे भारतासह जागातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. कारण भारताला जेवढ्या ऊर्जेची गरज आहे, त्यातील जवळपास 40 टक्के कच्चं तेल, एलपीजी गॅसची याच मार्गाने वाहतूक होते. दरम्यान 40 दिवसांनंतर अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला होता. आता पुन्हा एकदा परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी संपूर्ण जगाला आशा होती, मात्र पुन्हा एकदा काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमधील युद्ध पेटलं आहे.

याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून जाणारं एक मोठं जहाज समुद्री माईनला धडकलं आहे. त्यानंतर प्रचंड मोठा स्फोट या ठिकाणी झाला आहे. इराणच्या न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार हे जहाज स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये रस्ता चूकलं आणि त्यानंतर समुद्री माईनला धडकलं, माईनला धडकताच प्रचंड भीषण असा स्फोट झाला आहे. दरम्यान हे जहाज नेमकं कोणत्या देशाचं होतं? या जहाजावर किती क्रू मेंबर्स होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष वाढला असतानाच आता ही घटना घडली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us