मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, भीषण हल्ला, देशात हाहाकार, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानवर भीषण दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. या घटनेनं पाकिस्तान चांगलंच हादरलं आहे. दहशतवाद्यांनी काही जवानांचं अपहरण देखील केल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, भीषण हल्ला, देशात हाहाकार, अनेकांचा मृत्यू
Massive terrorist attack in Pakistan
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 07, 2026 | 5:03 PM

दहशतवादाला आश्रय देणार्‍या पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तामध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बलुचिस्तानच्या जियारत जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी एका पोलीस चौकीवर हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांकडून जोरदार फायरिंग करण्यात आली. या हल्ल्यामध्ये 9 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी 5 सैनिकांचं अपहरण केल्याची माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिलं, या हल्ल्यामध्ये 15 दहशतवादी मारल्याची माहिती समोर येत आहे.

या दहशतवादी हल्ल्याबद्दल माहिती देताना जियारत पोलीस ठाण्याचे अधीक्षक अब्दुल कुदूस यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांनी पोलीस चौकीला निशाणा बनवलं, पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर रात्रभर या परिसरात गोळीबार सुरू होता. दोन्हीकडून जोरदार फायरिंग करण्यात आली, या घटनेत मांगी पोलीस ठाण्याचे एसएचओ मोहम्मद हुसैन, कोवास पोलीस ठाण्याचे एसएचओ सोहबत खान आणि दहशतवाद विरोधी पथकाचे इंचार्ज सैफु्लाह यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात 15 दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

या हल्ल्याबद्दल माहिती देताना बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार शाहिद रिंद यांनी सांगितलं की, पोलीस चौकीवर हल्ला झाल्याचं समजताच आम्ही घटनास्थळी क्लिअरन्स ऑपरेशन राबवलं, रात्रभर गोळीबार सुरू होता. या हल्ल्यामध्ये आमचे काही पोलीस मारले गेले आहेत. तर दुसरीकडे 15 दहशतवादी ठार झाले आहेत. हा हल्ला टीटीपी तहरीक -ए- तालिबान पाकिस्तान ने घडवून आणला आहे, अशी माहिती देखील शाहिद रिंद यांनी दिली आहे.

दहशतवाद्यांनी थेट पाकिस्तानमधील पोलीस चौकीला आपलं लक्ष बनवलं, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तान चांगलंच हादरलं आहे. दुसरीकडे 15 दहशतवादी मारल्याचा दावा देखील पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. एकीकडे पाक व्याप्त काश्मीरमध्ये मोठं आंदोलन सुरू असतानाच आता बलुचिस्थानमध्ये मोठा हल्ला झाला आहे.

Follow Us