AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Earthquake : जगात हाहाकार… आक्रोश आणि किंकाळ्या…10 हजार लोकांचा मृत्यू? व्हेनेझुएलात भूकंपाने दहशत

व्हेनेझुएलात अवघ्या एका मिनिटांत दोन शक्तिशाली भूकंपांचे धक्के बसले, ज्यामुळे प्रचंड विनाश झाला. शेकडो इमारती कोसळल्या, एअरपोर्टचेही मोठे नुकसान झाले. राजधानी काराकससह अनेक शहरांमध्ये भयानक दृश्ये पाहायला मिळाली. यूएसजीएसच्या अंदाजानुसार, मृतांचा आकडा १०,००० पेक्षा जास्त असण्याची भीती आहे, ज्यात मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे.

Earthquake :  जगात हाहाकार… आक्रोश आणि किंकाळ्या…10 हजार लोकांचा मृत्यू? व्हेनेझुएलात भूकंपाने दहशत
व्हेनेझुएलात भूकंपाने दहशत
| Updated on: Jun 25, 2026 | 8:23 AM
Share

अवघ्या एका मिनिटांच्या आत बसलेल्या दोन शक्तिशाली भूमंपाच्या धक्क्यामुळे व्हेनेझुएलात प्रचंड नुकसान झालंय. शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या, क्षणात पत्त्याच्याबंगल्याप्रमाणे खाली कोसळल्या. भूकंपामुळे एअरपोर्टचेही बरेच नुकसान झालं आहे. राजधानी काराकसपासून ते व्हेनेझुएलातील वेगवेगळ्या शहरातील व्हिडीओ समोर आले असून त्यामधून अतिशय भयानक, भीतीदायक , विदारक चित्र दिसत आहे. या दुर्दैवी घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या (USGS) अंदाजानुसार, मृतांचा आकडा 10 हजारांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

या भयानक आपत्तीमुळे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली असण्याची शक्यता आहे, असं यूएसजीएस (USGS) ने म्हटलं आहे. मृतांची संख्या 10 हजारांपासून ते आणखी पुढे असण्याचा अदांज वर्तवण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप मृत किंवा जखमींची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही; मात्र स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्षदर्शींनी इमारती कोसळणे, बचावकार्य सुरू असणे आणि बळींची वाढती संख्या यांबाबत माहिती दिली आहे.

भूकंपामुळे किती नुकसान ?

राजधानी काराकसमध्ये भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी अनेक इमारती कोसळल्या, लोकांचा आक्रोश आणि किंकाळ्या सर्वदूर ऐकू येत होत्या. अनेक लोकं ढिगाऱ्याखाली अडकून पडले होते, मदतीची याचना करत होते. अनेक घरे आणि इमारती कोसळल्या आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती निवारण पथकांना त्वरित तैनात करण्यात आले आहेत, अशी घोषणा गृहमंत्री डायोस्दादो कॅबेल्लो यांनी सरकारी दूरचित्रवाणीवरून केली.

धूळ, ढिगारे आणि लोकांचा शोध सुरू

संध्याकाळपर्यंत, बचावकार्य करणारे पथकातील कर्मचारी, कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेक लोकांचा शोध घेताना दिसून आले. आपल्या हरवलेल्या नातेवाईकांविषयी माहिती मिळवण्यासाठी अनेक कुटुंबियांनी घटनास्थळी गर्दी केली होती. आपलं माणूस कुठे आहे, ते ठीकठाक आहेत ना असे प्रश्न, ती चिंता त्यांच्या डोळ्यांत दिसून येत होती. त्यांचे हालहवाल जाणून घेण्यासाठी लोकं बेचैन झाले होते.

मृतांचा नेमका आकडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नसला तरी भीषण भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अँब्युलन्स, रुग्णालये यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक शहरांमधील शाळा आणि सार्वजनिक कार्यक्रम पुढील सोमवारपर्यंत रद्द करण्यात आले आहेत.

Follow Us
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या संघर्षविरोधात...
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या कथित गैरव्यवहाराविरोधात संघर्ष मोर्चा, म्हशींसह रस्त्यावर उतरले आंदोलक
सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
Gokul : सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
गोकुळच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी..
Gokul Protest : गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी अन् पारंपरिक साहित्य घेऊन रस्त्यावर
गोकुळच्या संघर्ष मोर्चाला वकिलांचाही पाठिंबा! अनेक वकील....
Gokul : गोकुळच्या संघर्ष मोर्चाला वकिलांचाही पाठिंबा! कोल्हापुरातील अनेक वकील थेट रस्त्यावर; सरकारी हस्तक्षेपाविरोधात एकजुटीने सहभाग
गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी....
Gokul Protest : गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी पायताण, यमराजाची वेशभूषा अन्..., सतेज पाटलांच्या मोर्चाची राज्यभर चर्चा
रस्त्यावरची लढाई लढणार सतेज पाटील यांचा थेट इशारा...
Gokul : रस्त्यावरची लढाई लढणार सतेज पाटील यांचा थेट इशारा
राज्याच्या राजकारणात काय घडतंय, गंमत बघायची; राऊतांचं सूचक विधान....
Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात काय घडतंय, त्याची गंमत बघायची; संजय राऊतांचं सूचक विधान, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
गोकुळमध्ये आतापर्यंत काय घडलं? VIDEO बघाच...
Gokul : गोकुळमध्ये आतापर्यंत काय घडलं? VIDEO बघाच...
उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर; शरद पवारांची घेणार भेट, राष्ट्रवादीच्या
Uddhav Thackeray Meets Sharad Pawar : उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर; शरद पवारांची घेणार भेट, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही चर्चा होणार?
दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल...
Western Railway : दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल यंत्रणा ठप्प; लोकल 15 ते 30 मिनिटे उशिराने