AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाचे लक्ष अमेरिकेकडे, आज होणार मोठा निर्णय, थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी झाला. मात्र, त्यामध्येच इस्त्रालचे पंतप्रधान अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भेटीला पोहोचले. आज इराणचे भविष्य ठरणार आहे. इराणबद्दल आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीबद्दल मोठी माहिती पुढे येत आहे.

जगाचे लक्ष अमेरिकेकडे, आज होणार मोठा निर्णय, थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत..
Donald Trump
| Updated on: Jul 29, 2026 | 7:41 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धादरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. ही एक खासगी बैठक होती, यात नक्की काय चर्चा झाली, याबाबत कोणताही माहिती पुढे येऊ शकली नाही. इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून 28 फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केला. तेव्हापासून हे युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धामुळे जगाची पार वाट लागली. मात्र, या युद्धादरम्यान इस्त्रायल आणि अमेरिकेतील तणाव वाढला. इस्त्रायलच्या म्हणण्यांनुसार,अमेरिकेने इराणच्या पायाभूत सुविधांना टार्गेट करून मोठे हल्ले केले पाहिजेत. मात्र, ते करताना अमेरिका दिसत नाही. यादरम्यानच आता या दोघा नेत्यांची भेट झाली. बैठकीच्या अगोदर एक असा रिपोर्टपुढे येत होता की, नेतन्याहू डोनाल्ड ट्रम्प यांना इराणच्या न्यूक्लियर ठिकाणांबद्दल गुप्त माहिती देणार आहेत.

त्यानंतरच इराणबद्दल निर्णय होईल. बंद खोलीत दोन्ही नेत्यांनी बैठक घेतली. पण या बैठकीत नक्की काय चर्चा झाली, याबाबतची काहीच माहिती पुढे येऊ शकली नाही. नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीचा फोटो शेअर केला. त्यांनी फोटो शेअर करत म्हटले की, मी माझा मित्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये बैठक करत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, इराणच्या न्यूक्लियर पावरबद्दल आज महत्वाचा निर्णय होईल. जो काही इराणबद्दल निर्णय होईल, तो आजच होणार आहे. इराणवरील हवाई हल्ले अमेरिकेने थांबवली आहेत. काही काळासाठी हल्ले थांबवण्याचा निर्णय यादरम्यान त्यांनी घेतला. इराणवर मोठे हल्ले करताना अमेरिका दिसली होती. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, आम्ही इराणवरील हल्ले थांबवत आहोत. इराण आणि अमेरिका यांच्यातील थांबलेला तणाव इस्त्रायलला नको आहे. अमेरिकेने इराणवर मोठे हल्ले करावेत, याबाबत अनेकदा इस्त्रायल बोलला आहे. ज्यामुळेच अमेरिका आणि इस्त्रायलचे संबंध ताणले होते. इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका या दोनच देशांना नाही तर संपूर्ण जगाला बसत आहे.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा