
पारंपारिक युद्धात बंदुका, रणगाडे, मिसाइल्सचा वापर होतो. पण भविष्यातील आधुनिक युद्ध मानवरहीत घातक अस्त्रांच असणार आहे. ड्रोन आता केवळ एक शस्त्र उरलेलं नाही, तर आधुनिक युद्धातील महत्वाचं अस्त्र बनलं आहे. स्वस्त, वेगवान, अचूक आणि घातक ड्रोन्स आता सगळ्याच देशांना हवे आहेत. युक्रेन युद्धात ड्रोन्सनी आपली घातकता आणि अचूकता दाखवून दिली आहे. जगभरातील संरक्षण सामुग्री बनवणाऱ्या डिझायनर्सनी अशा घातक ड्रोन्सवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मायक्रो ड्रोनचं वजन एका छोट्या पक्षाइतकं किंवा एका मच्छर इतकं असू शकतं. हे ड्रोन सामान्य डोळ्याला दिसणं कठीण, त्याचा आवाज ऐकू येणं अशक्य आणि रोखणं तर जवळपास इम्पॉसिबल आहे.
CSIS चे शस्त्र एक्सपर्ट जॅकरी कॅलनबॉर्न यांनी इशारा देताना सांगितलं की, “सध्या बॅटरी मायक्रो ड्रोनचा वीक पॉइंट आहे. बॅटरी कमजोर आहे. पण ही कमजोरी दूर केल्यानंतर हे ड्रोन्स युद्धातील सर्वात घातक अस्त्र ठरतील. कारण पक्षी, मच्छर सारख्या आकाराच्या या ड्रोन्सची ओळख करणचं कठीण होऊन बसेल. ज्या देशाकडे अशा प्रकारची ड्रोन्स असतील, तिथे शत्रुला माघार घ्यावीच लागेल. युद्धभूमीत ही मायक्रो ड्रोन्स गेमचेंजर ठरतील”
अशी ड्रोन्स किती घातक?
“मायक्रो ड्रोन स्वॉर्म रासायनिक आणि जैविक हल्ला करु शकतात. कोणाला काही कळू न देता गुपचूप हल्ला करणं त्यांची खासियत बनू शकते. कुठल्याही वर्दळीच्या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो. शेकडो, हजारो मायक्रो ड्रोन एकाचवेळी सोडले तर कुठलीही एअर डिफेन्स सिस्टिम त्यांना पकडू शकत नाही” असं कॅलनबॉर्न यांनी सांगितलं.
अमेरिकेत या टेक्नोलॉजीवर काय काम सुरु आहे?
अमेरिकेतली संरक्षण कंपन्या अशी मायक्रो ड्रोन स्वॉर्म टेक्नोलॉजी विकसित करण्याच्या मागे लागल्या आहेत. आपलं लक्ष्य निवडण,हवेत दिशा बदलणं, शत्रुच्या UAV ला धडकून आत्मघातकी हल्ला, सैनिक, मिसाइल्स आणि वाहनांना घेरुन क्षणार्धात संपवणं ही उद्दिष्ट्य मायक्रो ड्रोन विकसित करण्यामागे आहेत. एक्सपर्टने असं सांगितलं की, “एकदिवस असा येईल जेव्हा तुम्ही 50 डॉलरच्या ड्रोनने 50 लाख डॉलरचं मिसाइल पाडालं”
त्याचवेळी खऱ्या अर्थाने ‘स्वचालित युद्धाचा’ जन्म
मानवी सूचनेशिवाय युद्धभूमी समजून घेणारे, अडचणी ओळखून रस्ता बदलणारे, लक्ष्याची प्राथमिकता ठरवणारे आणि गरजेनुसार रणनिती बदलणारे अशी स्वॉर्म एल्गोरिदम विकसित करण्यावर भर आहे. त्याचवेळी खऱ्या अर्थाने ‘स्वचालित युद्धाचा’जन्म होईल.